वर्तमानपत्र ,शब्दकोडे आणि वाचक यांचे काही वर्षापुर्वी त्रिकूटच तयार झालेलं होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुर्वी काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांमुळेच ओळखली जात होती अस म्ह्णा अथवा काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांसाठीच विकत घेतली जात होती असे ही म्ह्णता येईल . कालांतराने ते चित्र किंचित बदललं. लोकांना मोबाईलच्या माध्यमातून टाईमपास करण्यासाठी वेगवेगळी माध्यमे निर्माण झाली. त्यामुळे वर्तमानपत्रातील शब्द्कोड्याचं महत्व हळूहळू कमी हेऊ लागल. काही वर्तमानपत्रांनी त्या ही परिस्थितीत शब्द्कोड्यांची जागा अबाधित ठेवली, तर काही वर्तमानपत्रांनी शब्दकोड्यांना पूर्णपणे बगल दिली. रेल्वेने लाबं पल्ल्याचा प्रवास करणारे वर्तमानपत्रांचे वाचक वेळ घालविण्यासाठी शब्द कोडे आवर्जून सोडवत बसायचे. आता त्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. मी ही सुरूवातीला शब्द्कोड्यांकडे एक विरंगुळा म्ह्णूनच पाहायचो. काही लोकांना शब्दकोडे सोडविणे म्ह्णजे निव्वळ टाईमपास आणि वेळेचा दुरूपयोगच वाटतो. शब्दकोडे प्रत्यक्षात सोडविणार्यालाच माहित असते की ते सोडविणे किती जिकरीचे काम असते. शब्दकोडे सोडविणे जर अवघड असेल तर ते शब्दकोडे तयार करणे किती अवघड असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. शब्दकोडे तयार करण्याचा एक अपयशी प्रयत्न मी ही करून पाहिला होता. त्यानंतर पुन्हा कधी ही शब्दकोडे तयार करण्याच्या फंदात मी पडलो नाही. काही वर्षापुर्वी मी एका वर्तमानपत्रासाठी लेख पाठवायचो त्यावेळी त्या वर्तमानपत्रात माझे लेख आवर्जून प्रकाशित व्हायचे. त्याकाळी ते वर्तमानपत्र रोज माझ्या घरी येत असल्यामुळे त्यातील शब्दकोडे मी जवळ – जवळ रोजच्या रोज पुर्ण सोडवित असे. त्यातून माझा असा गैरसमज झाला की आता आपल्याला सगळ्च येतय. आता आपण कोणतेही शब्द्कोडे सोडवू शकतो. मी त्याच वर्तमानपत्रात लिहित असल्यामुळे माझ्या शब्दकोड्यांना बक्षीस काही मिळाले नाही. त्यानंतर बरीच वर्षे माझी शब्दकोडे सोडविण्याची सवय मोडली. आता ही मी कोणतेही शब्दकोडे जवळ पास सोडवू शकतो याची मला खात्री होती. हल्ली वृत्त मानस हे दैनिक नियमित वाचत असल्यामुळे त्यात असणारे शब्दकोडे सोडविण्याचा मोह झाला. त्यातील शब्दकोडे सोडवित असताना मी शब्दकोड्यांबद्द्ल नव्याने विचार करू लागलो. इतक्या दिवस मी शब्दकोड्यांना फारसे गांर्भियाने घेत नसे पण आता मला वाटते की सर्वच वाचकांनी खास करून मराठी वाचकांनी शब्दकोड्यांना गांर्भियाने घ्यायलाच हवे. सध्याच्या संगणकाच्या युगात आपले वाचन कमी झालेले आहे. व्यव्हारातही बोलताना सलग मराठी भाषेचा वापर न करता आपण हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेची मिसळ तयार करून बोलत असतो. त्यासाठी ही आपण काही मोजक्याच शब्दांची मदत घेत असतो. त्यामुळे पुर्वी कधी तरी आपल्या वाचनात आलेले शब्द, संदर्भ आणि नावे ही आपण विसरतो. आपल्या जवळील शब्द संग्रह दिवसेन – दिवस कमी होत जातो. मराठीतील एखादा शब्द आपल्याला मराठी लिहताना अथवा बोलताना आठविला नाही तर आपण सर्रास तेथे हिंदी अथवा इंग्रजी शब्द चिकटवून टाकतो. आपल्या जवळील शब्दसंपत्ती जर आपल्याला वाढवायची असेल, आपल्याला मेंदुला जर रोजच्या रोज चालना दयायची असेल आणि आपल्या भाषेवरील असलेले आपले प्रभुत्व आबाधित ठेवायचे असेल तर वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवित राहणे हा आपल्या मेंदुला एक उत्तम व्यामच म्हणावा लागेल. मोबाईलवर विडेवो गेम खेळ्त राहण्यापेक्षा शाळेय मुलांनी वर्तमानपत्रातील ही शब्दकोडी सोडविल्यास त्यांना त्याचा अधिक फायदा होईल असे माझे वयक्तीक मत आहे. शब्दकोड्यांचे महत्व ओळखून त्यांना आजही जागा देणार्या वृत्त मानस आणि आणि त्याच्या सारख्या इतर सर्वच दैनिकांच वाचकांनी आभारच मानायला हवेत. त्याच बरोबर ही शब्दकोडी सातत्याने तयार करणार्या कल्पक लोकांचे ही आभारच मानायला हवेत, ही कोडी तयार करणारे कधीच वाचकांसमोर येत नसले म्ह्णून त्यांच आणि त्यांच्या कामाचे महत्व कमी होत नाही. सांगायच तात्पर्य इतकच की वर्तमानपत्रातील शब्द्कोड्यांची जागा यापुढे ही सुरक्षित राहायला हवी…
— निलेश बामणे
Leave a Reply