नवीन लेखन...

शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

प्रती,

श्री. गंगाधर मुटे,

कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन,

नमस्कार,

दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे.  सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा हा अभिप्राय सर्वांपर्यंत पोहचवावा ही अपेक्षा.

हा सलग दुसरा साहित्य सोहळा म्हणजे शेतकरीवर्गासाठी व सर्वसामन्य माणसासाठी शेतकरी साहित्याची एक पर्वणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून… हे मराठी शेतकरी साहित्य संमेलन…. 

जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ पत्रकार आणि शेतीतज्ञ ह्यांची अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभणे ह्यातच ह्या संमेलनाचे यश दिसून येते.  मान्यवरांनी ह्या निमित्ताने मांडलेले विचार अतिशय प्रगल्भ होते व सर्वसामन्य माणसाला विचार करायला लावणारे तर होतेच तसेच अतिशय मार्गदर्शक असे होते.   

ह्या संमेलनात आपण प्रकाशित केलेली पुस्तके मा. शरद जोशी विशेषांक शेतकऱ्यांचा सूर्य”, गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रह – “नागपुरी तडका”, व प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह – “कणसातील माणसं”, हे सर्वसामान्य माणसासाठी साहित्यक मेजवानीच म्हणावे लागेल. शेतकरी साहित्य चळवळीच्या अथक परिश्रमाचे झालेले हे चीजच आहे. संमेलनाचे बोधचिन्ह नांगराच्या फाळाला लावलेली लेखणी त्याचेच हे फलित आहे असे मला जाणवले.    

ह्या संमेलनाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आपण आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद हे होत. उदा. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण | मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव | शेतकरी आत्महत्या; कारणे व उपाय | शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून | शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान. सर्वच परिसंवाद उल्लेखनीय झाले. वक्ते, विचारवंत तसेच त्या त्या विषयातील तज्ञांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण, निसर्गाचे कालचक्र, शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यावर चालणारे राजकारण, विविध कारणे मीमांसा, उपाय व सर्वात कळीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्यावर झालेली चर्चा अगदी संयुक्तिक तर होतीच पण मार्गदर्शक होती व पुढील वाटचालीस प्रेरक अशीच होती. 

शेतीकरी गझल मुशायरा आणि शेतीकरी कवी संमेलन … हा प्रयोग म्हणजे मनोरंजांतून विचार मंथन असाच वाटला. एका पेक्षा एक उत्तोमोत्तम गझलांचे व कवितांचे सादरीकरण, शेतकरी ह्या विषयवरील साहित्याने घेतलेली दखल खूप काही सांगून जाते. प्रचलित कवी आणि नवोदित कवी ह्याची अतिशय उत्तम सांगड आपण ह्या निमित्ताने घालून एक नवीन पायंडा घालून दिलात त्यासाठी आपले आभार. भविष्यात शेतकरी दुर्लक्षित राहणार नाही ह्याची ग्वाही ही कवी मंडळी देऊन जातात, कारण आजवरचा सिद्धांत आहे की काव्यात जी ताकद आहे ती कुढल्याही शस्त्रात नाही.   

तुला कसला नवरा हवाही नाटिका तर मनोरंजांतून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती.  शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्यांच्यावर चाललेले राजकारण आणि शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांच्या मनातली तळमळ ज्या प्रगल्भतेने व्यक्त केली गेली त्या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि लेखाचे मन:पूर्वक अभिनंदन.   एक अभिनव असा हा प्रयोग. अतिशय संयुंक्तिक वातावरणात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक आणि आभार. 

आपण मला ह्या संमेलनास आमंत्रित करून जो काही मान-सन्मान दिलात, तसेच मला शेतकरी कवी संमेलनात माझी हक्क जगण्याचे वंचित होतेही कविता सादर करण्याची संधी व त्या कवितेस आंतरजाल स्पर्धेत पद्यकविता सदरात मानपत्र देऊन पुरस्कृत केलेत आणि माझ्या सहा कविता आपण कणसातील माणसं, ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करून मला साहित्यिक प्रतिष्ठा देऊन उपकृत केलेत, ह्या साठी मी आपला खूप खूप आभारी व ऋणी आहे.  

मला स्वत:ला हे संमेलन खूप काही देऊन आणि शिकवून गेले.  खूप सारे शेतकरी, साहित्यिक आणि कवी मित्र मिळाले व शेतकरी साहित्य चळवळीशी स्नेह्बद्ध होऊन धन्य जाहलो. 

खासकरून मुटेसर मला तुमचा खूप अभिमान आहे.  मी तुमचे फार कौतुक करतो आहे असे वाटेल पण त्याला इलाज नाही.  तुमच्या सारख्या एक शेतकऱ्याने अशी एक साहित्य चळवळ चालवावी आणि भल्या भल्यांना तोंडात बोटे घालयला लावेल अशी त्याची योजना, आखणी, नियोजन व संमेलन, सलग दुसऱ्यांदा घडवून सहज यशस्वी करून दाखवावे ह्याला तोड नाही. निंदक तर असावेतच पण समर्थकही असले की पुढील कार्यास नवे बळ आणि प्रोत्छान मिळते असे मला वाटते.  दोन दिवस फक्त शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे विषय आजवर आयुष्यात कधी अनुभवलेच नव्हते, ते ह्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे अनुभवले आणि कृतकृत्य झालो. जसा आपला एक घास सीमेवरील जवानांसाठी अडतो तसाच आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठीही अडला पाहिजे ह्याची जाणीव प्रकर्षाने आज मला झाली.  हीच ह्या संमेलनाची फलश्रुती आहे.

शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील वाटचालीस माझ्या अनंत शुभेछ्या.

 — रविंद्र कामठे, पुणे.

भ्रमणध्वनी +९८२२४०४३३३०. ravindrakamthe@gmail.com

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..