दोन एकदिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात – आठ भटक्याकुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले.जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावेलागले असते. भटाक्या कुत्र्यांचा हाउपद्रव गरीब लोकांना अजून किती दिवस मूकपणे सहन करावा लागणार आहे. या सर्वाशीसंबंधित अधिकारी आणि प्रशासन काही ठोस पावले कधीतरी उचलणार आहे का ? मुंबईसारख्याशहरात ही या भटाक्या कुत्र्यांच्या भीतीने कित्येकांना आपला जीवमुठीत घेऊन फिरावे लागते, कित्येकाना आपल्याच घरात जाणारा मार्ग बदलावा लागतो,रात्री -अपरात्री घरी जायचे झाल्यास बस ऐवजी रिक्षा वगैरे चा पर्याय जवळ करावालागतो. भटाक्या कुत्र्यांच्या समस्येकडेआपण अजूनही एक समस्या म्हणून पाहायला लागलेलो नाही असेच चित्र आहे . भटाक्या कुत्र्यांच्या समस्येला कोणी कदाचित एक समस्याम्हणून पाहायलाच तयार नाही. लहान मुल तर सोडा अगदी म्हातारी माणसेही याकुत्र्यांच्या भयाने त्रासलेली दिसतात. पेपरवाले, दुधवाले,भाजीवाले आणि इतर वस्तूने – आण करणारे या भटाक्या कुत्र्यांचे जणू सावजच ठरत असतात. रात्री याकुत्र्यांच्या भयाने काही भागात चोर भटकत नाहीत हे खरे असले तर त्यामुळे पोलीसांच काम कमी होत पण डॉक्टरांचकाम वाढलेले असते हे कधी तरी कोणी लक्षातघेणार आहे का ? रेबीज च्या लसीवर होणारा लाखांचा खर्च कळत – नकळत जनतेच्याच माथीमारला जात असतो ना ? भटाक्या कुत्र्यांच्या सामस्येकडे सहानुभूतीने पाहण्यापेक्षा आता डोळसपणे पाहण्याचीवेळ जवळ आली आहे . मुंबई सारख्या शहरात भटाक्या कुत्र्यांची समस्या कमीहोण्या ऐवजी दिवसेन दिवस अधिक उग्र रूप धारण करताना दिसत आहे. मुंबईत किती भटकीकुत्री आहेत त्याचा अधिकृत आकडा कोणाकडे असण्याची शक्यता जवळ – जवळ ना च्याबरोबरीची आहे. पण मुंबई ही भटकी कुत्री किती जणांना चावतात याचा आकडा नक्कीच असेल निदान तो आकडा पाहून तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यांच्या दिशेने पावलेनको का उचलायला ?
— निलेश बामणे
Leave a Reply