सांग मी नसेल तर काय करशील..
कोणाच्या नजरेत पाहशील,
कोणाच्या आठवणी जपशील,
कोणाची मैत्रीण म्हणुन मिरवशील,
सांग मी नसेल तर काय करशील..
कोणाचे लाड़ पुरवशील,
कोणाचे गालगुच्चे घेशील,
कोणाला तु माझाच आहेस असं म्हणशील,
सांग मी नसेल तर….
बाईकवरुन फिरताना कोणाच्या
खांद्याचा आधार घेशील,
कोणासोबत चाँकलेटचा अस्वाद घेशील,
सांग मी नसेल तर….
समुद्रकाठी फिरताना कोणाचा
हात पकड़शील,
दुःखात जेंव्हा सापड़शील तेंव्हा
कोणाच्या मिठीत शिरशील,
गर्दझाड़ीतही निर्भीड़पणे कोणासोबत
बसशील,
सांग मी नसेल तर….
कोणाच्या चेहर्यावरचा घामसुध्दा
स्वताच्या रुमालाने पुसशील,
कोणासाठी घासातला घास
आठवणीने काढ़शील,
सांग मी नसेल तर….
मोबाईलमध्ये बँलंन्स असुनही
कोणाला मिस्ड़काँल करशील,
स्वताचं पोट भरल्यावरतरी
कोणाला केक पुरवशील,
कोणासोबत ऐका ताटात बसशील,
ऐका नारळातलं पाणी दोन स्टाँच्या
मदतिने कोणासोबत पिशील,
सांग मी नसेल तर….
संध्याकाळी अंधारातुन घरी
जेंव्हा परतशील,
ओरड़ा आईचा वाचविण्यासाठी
कोणाचं नाव सांगशील,
झाड़ असेल पण कळी नसेल
मग फुलाचं काय करशील,
खरंच सांग मी नसेल तर….
प्रमोद पाटील
(ओन्ली फाँर हर)
— प्रमोद पाटील
Leave a Reply