वाटल नव्हत कधीच माझ्या वाढदिवसाची जग दखल घेईल
आणि कोसळेल पाऊस शुभेच्छांचा माझ्यावर अनायास …फ़ेसबुकच्या माध्यमातून
खर्या आयुष्यातील मित्रांपेक्षाही का कोणास जाणे हल्ली
फ़ेसबुकवरचे मित्रच अधिक जवळचे वाटू लागले आहेत
कारण ते त्यांची सुखदुखे रोजच शेअर करतात… फ़ेसबुकच्या माध्यमातून
माझ्या कवितांचा आस्वाद घेतला नाही कधी अगदी माझ्या जवळ असणार्यांनी
पण माझ्यापासून हजारो मैल दूर अगदी परदेशातही राहणार्या
मित्रांनी कित्येकदा स्तुती केली आहे माझ्या कवितांची…फ़ेसबुकच्या माध्यमातून
मोबाईलच्या माध्यमातून लोक जवळ आली पण मन दूर गेली
ती दूर गेलेली मनही माझ्या मनाच्या पुन्हा जवळ आली …फ़ेसबुकच्या माध्यमातून
लोक सहज म्हणतात माझे ना सतराशे साठ मित्र आहेत पण जे प्रत्यक्षात नव्हते
विनोदाने सांगायचं तर आज खरोखरच माझे सतराशे साठ मित्र आहेत …फ़ेसबुकच्या माध्यमातून
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply