३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला जाणं म्हणजे एक शिक्षाच. हॉटेलात गेलं की जागा मिळेल की नाही, जागा मिळाली तर दिलेली ऑर्डर वेळेत येईल की नाही याची अजिबातच खात्री नसते. ब:याचदा आपल्या आवडीच्या हॉटेलात तर जायलाच मिळत नाही. मग कुठेतरी काहीतरी खावून ३१ डिसेंबर साजरा करण्याचं उसनं समाधान चेहे:यावर मिरवावं लागतं. त्या ऐवजी पार्टी करायला नेहमी हॉटेलात कशाला जा ? घरच्या घरी पार्टी केली तरी मजा येते. व या वर्षी एक निर्णय घ्या कि ३१ डिसेंबर ला घरी पार्टी करणार व फँमिली सोबत जेवण करणार. घरी पार्टी करणार म्हणजे मेनू ठरवणे आले. पार्टीचा मेनू म्हणजे स्नॅक्स व डिनरचा. ज्या घरात नॉनव्हेजचा बेतही चालू शकेल त्यांनी यावेळेस आपण वेलकम ड्रिंक म्हणून मॉकटेल, स्नॅक्स म्हणून चिकन लॉलीपॉप, रेशमी कबाब, शामी कबाब हे सर्वात उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय चिकन बिर्याणी, अशा लज्जतदार पदार्थाची मेजवानीही करू शकतो. जेवणानंतर स्वीट डिश लागतेच, त्यामुळे केक हा उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांत आईस्क्रीम खाण्याची मजा काहीच औरच असते. त्यामुळे पार्टीला रंगत आणायची असेल तर आईस्क्रीम पाहिजेच. आईस्क्रीमचेही अनेक प्रकार असल्याने आपल्याला आवडतील त्या आईस्क्रीम बनवू शकतो. नववर्षाची पहिली रात्र डान्स, गाण्याने होत असते. त्यामुळे अशावेळेस पाहुण्यांना हलके पदार्थ देऊन ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात आईस्क्रीम तर आहेच पण आपण पॉपकॉर्नही देऊ शकतो. त्यासोबत मस्तानी आपण देऊ शकतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply