रामगणेशगडकरी यांचे भावबंधन नाटक १८ ऑक्टोबर १९१९ रोजी ‘बलवंत संगीत मंडळी’ ने रंगभूमीवर आणले याला आज १०१ वर्षे झाली.
या नाटकात घन:श्याम आणि लतिका यांच्या अनुक्रमे चिंतामणराव कोल्हटकर आणि दीनानाथांनी केलेल्या भूमिका तर लोकांना आवडल्याच, पण दिनकर ढेरे यांनी महेश्वरच्या – कामण्णाच्या भूमिकेत वेगळीच मजा आणली. ती भूमिका त्यांना अगदी फिट्ट बसली आणि ते इतकी मनापासून आणि सहजतेने करीत की त्यांना त्या भूमिकेचेच नाव चिकटले आणि ते दिनकर ढेरे या नावाऐवजी ‘दिनकर कामण्णा’ याच नावाने सर्रास ओळखले जाऊ लागले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply