सामाजिक सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मैलाचा दगड बनलेले गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला. हे नाटक रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास घडवला. बालिका-जारठ विवाहांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येला वाचा फुटली. या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या विवाहाच्या किमान वयाचा कायदा करावा लागला. तो आजतागायत लागू आहे.
या नाटकातील अनेक पदे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. `म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान’ हे पदविनोदाचा एक मैलाचा दगड मानले जातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply