वार्धक्यातील काळजी
वयाच्या ६० ते ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींची गणना वृद्ध अशी होते. वृद्ध व्यक्ती सगळ्या सारख्या नसतात. प्रसिद्ध जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्काव्ह यांनी म्हटलेले आहे, की Man is as old as his arteries. म्हणजे माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्यास वृद्ध तितका तो वृद्ध असतो. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला रक्त नेणाऱ्या रोहिण्यांची स्थिती त्या-त्या अवयवाची कार्यक्षमता ठरविते. सगळेच अवयव महत्त्वाचे खरे; […]