नवीन लेखन...

आपले यकृत निरोगी ठेवा

यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग एक

अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ? नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ? ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ? एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज ! केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ? अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं […]

उस्ताद अमीर खॉं

अमीर खॉं यांचा महाराष्ट्रातील अकोला गावी जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्याव साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी झाला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे […]

रेडिओ दिनानिमीत्त कम्युनिटी रेडिओची माहिती

कम्युनिटी रेडिओ म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागासाठी किंवा विशिष्ट समाजासाठी असलेला रेडिओ. भारतात कम्युनिटी रेडिओची सुरुवात २००४ साली झाली. सुरुवातीला कम्युनिटी रेडिओ चालू करण्यासाठी असंख्य बंधने होती; पण २००८ नंतर ती बरीच शिथिल करण्यात आली आहेत. शेतीविषयक माहिती देणे, लोकांचे प्रबोधन करणे, शिक्षणविषयक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे ही कम्युनिटी रेडिओची मुख्य उद्दिष्टे असतात. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या […]

जागतिक रेडिओ दिवस

लहानपणी विविध भारती , बिनाका गीतमाला व आज च्या पिढीला विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा.. एकमेव अद्वितीय – रेडिओ आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घडय़ाळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात […]

ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड […]

ज्येष्ठ अभिनेते प्राण

आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवले. खलनायक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. कामामुळे वडिलांची सतत बदली होत असल्याने मा.प्राण यांचे शिक्षण कपूरथळा, उन्नाव, मेरठ, डेहराडून आणि रामपूर या […]

कोलेस्टेरॉल

चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. […]

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला.कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर […]

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

एक चित्रपट १४ वर्षे! पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे […]

1 283 284 285 286 287 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..