नवीन लेखन...

माना न माना !

हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या […]

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

किचन क्लिनीक – दही खायचे नियम

आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून. तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात: १)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये. […]

सत्य आणि निर्भयता

फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला […]

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोचीला डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गझलसम्राज्ञी

बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित […]

जीवन प्रवाह

जगणे अजून मजला साराच खेळ वाटे    जरी वाढलो वयाने  ही हार जीत वाटे    येता अजूनि वारा प्रणयाची झिंग चढते पावसात चिंब भिजता स्पर्शाची ओढ वाटते   नात्यातले दुरावे कितिदा दिले पुरावे खंतावलो तरीही संबंध गोड वाटे   असता असे जरीही निर्ल्लज जीव जगतो  आपुल्याच घरकुलाला तो बंदिशाला म्हणतो   एकदा तरी दिसावी सत्याची ज्योत स्वप्नी  आयुष्य शेवटी मी उधळीन दो हातांनी

मन कि बात – व्यसनं आणि सरकार..

प्रत्येक बजेटमधे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, एक गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे दारू-बिडी-सिगारेट (हानीकारकच परंतू ड्रग्सच्या तुलनेत कमी हानीकारक) आदी गोष्टींवरची करवाढ. या करवाढीमुळे सहाजीकच या गोष्टींच्या किंमती वाढतात. अशा किंमती वाढवल्याने लोक व्यसनांपासून दूर राहातील किंवा जातील असा शेख महंमदी विचार सरकार करत असणार. शेवटी सरकारचं मुख्य कर्तव्य ‘लोककल्याण’ हे असतं असं कालेजात असताना […]

मोबाईल

ही कविता लिहिणा-या कवीला त्रिवार वंदन ! मम्मी सोड मोबाईल माझ्या सोबत बोल थोडावेळ बागेमध्ये खेळु आपण चल…! सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ…! रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला तरीसुद्धा दिवसभर सोबत ठेवते कशाला…? पप्पा आज मोबाईल ऑफिसमध्ये विसरा माझा चेहरा होईल आनंदाने हसरा…! दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता […]

आज अर्वाचिन मुंबईचे शिल्पकार व ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट

त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे […]

1 285 286 287 288 289 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..