नवीन लेखन...

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।। जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।। नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।। छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो मरून गेला, कविता […]

समाजकार्यांची ‘साधना’

‘आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या ‘साधने’त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन […]

प्रखर राष्ट्रभक्ती

राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची […]

शामची आई

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ […]

अभिनय, दिग्दर्शनाचा “राजा’ राजा परांजपे

राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना […]

शायर निदा फाजली

होशवालों को खबर का, आ भी जा ए सुबह आभी जा… या गाजलेल्या गजलांचे शायर सुप्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली.त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला.निदा फाजली यांचे पिता मुर्तुज़ा हसन हे सुध्दा कवी होते. त्यांचे बालपण ग्वालियरमध्ये गेले होते. तेथेच त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर ते शायरीकडे वळाले. देशाच्या फाळणीवेळी कुटुंबीयांसोबत पाकिस्तानात न जाता, भारतातच राहण्याचा निर्णय […]

ठुमरी विश्वाची सम्राज्ञी शोभा गुर्टू

शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला.लोकांनी त्यांना ‘ठुमरी सम्राज्ञी’ म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या […]

गझल किंग जगजित सिंह

जगजीत सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे गायनातील गुण हेरून त्यांना पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे पाठविले. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. त्यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे खयाल, ठुमरी आणि द्रुपद हे गायनप्रकार पक्के करून घेतले. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले आहे. १९७० मध्ये चित्रा यांच्याबरोबर विवाहबद्ध […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

“दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?” “आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?” कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि […]

किचन क्लिनीक – जव

जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही. तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ […]

1 287 288 289 290 291 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..