नवीन लेखन...

देह

देह – बाळपणीचा सुखावणारा मातापित्यांना घरच्यांना दारच्यांनाही मऊ, रेशिमस्पर्शी पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा.. देह – यौवनातला …सुखवणारा इतरांना….स्वत:लाही रेशिमस्पर्शी सुख देणारा भोगणारा भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा गर्वोन्नत – टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा… देह – मावळतीचा काहीच न सोसणारा दुःखच नव्हे तर सुखही… जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा.. मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना देहावाचून अर्थ नाही तरीही तुझ्या-माझ्यात असावं देहापलिकडचं काही हातात घेतलेले […]

हास्यबँक (बँकेतील गंमती-जमती)

मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत. […]

कोपराचा सांधा

या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे. हे ढोलक्याकृती मुसळ अलना […]

तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला […]

मनगटाजवळील नस दबणे

हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात. काही कारणाने या बोगद्याची खोली कमी झाली तर ही मीडियन चेता दाबली जाते […]

खंत

इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये? शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी गोष्ट अर्धी राहून जाईल […]

हर्बल टूथपेस्ट आणि वनौषधी

पूर्वी दंतमंजन म्हणून पावडर स्वरूपात वनौषधींचा वापर होत असे. आता नीम, मिसवाक, लवंग, बाभूळ, पुदिना, पिंपळी यांसारख्या वनौषधींचा समावेश असलेल्या अनेक हर्बल टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कापूर, तोमर बीज या पदार्थांचा समावेशही काही टूथपेस्टमध्ये केलेला असतो. या वनौषधींमध्ये कोणती रसायने असतात, जी दातांचे संरक्षण करतात? दातदुखीसाठी लवंग तेलाचा वापर आजही केला जातो. लवंगेमध्ये ॲसिटाइल युजेनॉल, […]

कसोटी रक्कम हाताळणीची

बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला  पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही, […]

कुरकुर

रमा सकाळची कामे भरभरा उरकून. मशीन वर शिवायला बसली होती. लग्न सराई. संक्रात आणि इतर अनेक कारणाने शिलाईचे काम भरपूर आहे म्हणून ती लवकरच आवरुन मशीन वर शिवायला बसली होती पण आज मशीनचा मूड वेगळाच. खट खट असा आवाज आला आणि मशीन चालू होत नाही. […]

मनगटांच्या हाडांचे आजार

नगटाच्या हाडाजवळ दुखणे ही एक सहजसामान्य तक्रार असते. त्यात हे दुखणे नजरेसमोर असल्याने आणि रोजच्या कामात व्यत्यय आणणारे असल्याने रुग्णांच्या लवकर लक्षात येते. मनगटाचा सांधा पिचल्यानंतर योग्य बसविला न गेल्यास रेडीयस या हाडाची लांबी कायमची कमी होते. सांध्याची हालचाल पूर्वीपेक्षा कमी होते व सांध्याची रचना बदलल्याने होणाऱ्या अयोग्य हालचालीमुळेही हा सांधा दुखू लागतो. याच सांध्यात संधीवाताच्या […]

1 101 102 103 104 105 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..