‘ मी आणि ती ‘
२२ मे …..’ ती ‘ चा वाढदिवस..
तिला मी पहिल्यांदा
माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले,
चार चौघीसारखी ती , कुठे काम करते ,
काय करते त्यावेळी माहित नव्हते.
आमच्या घरच्यांना माहीत होते.
आम्ही मग भटकायला सुरवात केली,
तिलाही जॉब होता मलाही जॉब होता.
खोटे वाटेल मला दर शनिवार , रविवार
कामाला जावे लागे ….
असा माझ्या घरच्यांचा गैरसमज होता आणि तो खराही होता.
दर शनिवारी , रविवारी आम्ही भटकत असु
कुठेही वाटेल तिथे चर्चगेट ते दादर …भटकायचो …मामा काणेचे
हॉटेल हा मिटिंग पॉईंट.
क्वचित ठाण्याच्या साईडला मुलुंड पर्यंत येत असू
कारण मी ठाण्याला रहात असे.
असे दीड वर्ष झाले. आम्ही एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखू लागलो.
मला मुलींची एक गोष्ट खटकते.
त्या स्वतः कधीच स्वतःची पर्स उघडत नाही.
माझा आपला टॅक्स चालूच….
पण त्यात एक गम्मत असे ,
त्यात सुद्धा एक जगणे असते.
लग्नानंतर तिने संगितले
बाबांनी पर्स दिली…
मला माझा दीड वर्षाचा शनिवार
रविवारचा टॅक्स आठवला,।
मी म्हणालो रिकामी दिली..
त्यात पैसे होते..
…………………
…………………
…………………
होता होता 34 वर्षे झाली असतील…
अजूनही तसेच आहोत आम्ही…
माझी धतिंग आणि मस्ती काही कमी नाही.
मधल्या 34 वर्षात खूप काही पाहिले ………….
………………
खूप काही सोसले…
वर्षे जात होती वादळे येत होती..
ती शेकडो हातानी परतावून लावत होतो.
मी माणसे जोडली हे महत्वाचे.
अहो खूप काही उलटेसुलटे घडले…
सागायला गेलो तर…….
…………………………………..
……………………………………
……………………………………….
………………………………………
………………………………………
पाने भरतील…..
हा ..अजून आम्ही भेटतो..
ती हल्ली लांब रहाते…
ह्या कोरोनामुळे……भेटता येत नाही
सर्व काही लांब चालले आहे असे भासते…
हो आम्हाला मुलगाही आहे 32 वर्षाचा,,,
अनेकवेळा मतभेद झाले……
पण ‘ मी आणि ती ‘
अजून आम्ही एकत्र आहोत…
आणि हो…………..
गुड लक …
तिला गुड लक
अर्थात मलाच गुड लक
२२ मे हा ‘ तिचा ‘ वाढदिवस आहे….
‘ ती ‘ …..ती म्हणजे .
..निलीमा सतीश चाफेकर …
‘ ती ‘ आहे
म्हणूनच
‘ मी ‘ आहे…..
हे वाचल्यावर ती नक्की म्हणेल
पक्का ” नाटक्या ” आहेस…..
आणि बरेच काही..
— सतीश चाफेकर
Leave a Reply