स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेशची माहिती मिळावी म्हणून स्वयंपाक करतांना काही खास टिप्स. ज्यांचा वापर तूम्ही सहजपणे आपल्या किचन मध्ये करू शकता. ह्याचा उपयोग नवविवाहित व नवतरुण ललनांना होईल अशी आशा आहे.
१. इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदुळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते.
२. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते.
३. पोळयांच्या डब्यात आल्याचे एक दोन काप ठेवल्यास पोळया नरम राहतात.
४. वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थीत आहे की नाही हे माहित करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन थेंब एका कपभर पाण्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते.
५. कुरकुरे भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पिठ टाकावे.
६. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिळवावे. अंडयाचे द्रव्य बाहेर येणार नाही.
७. कारल्यामधील कडुपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रिजमधे ठेवा.
८. हिरव्या भाज्या निवडल्या नंतर त्यांना वर्तमान पत्रात गुंडाळून प्लास्टीक डब्यात ठेवावे.
९. कांदा दोन भागात कापून त्यास थंड पाण्यात किंवा फ्रिज मद्धे ५-१० मिनीटे ठेवल्यास कापतांना डोळयात अश्रु येत नाहीत.
१०. बटाटे आणि कांदे एकत्र साठवु नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात.
११. बटाटयाचे चिप्स बनवितांना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत त्याने ते फार क्रिस्पी बनतात.
१२. भेंडी ची भाजी बनवतांना त्यात १-२ लिंबुच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही.
१३. पुरी किंवा भजे तळतांना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल.
१४. पनीर ला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पॉंजि होते.
१५. जर जेवणात कमी मीठ पडलं तर वरून घालता येतं पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो. जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही. पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, थोड्यावेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
१६. जर शेवया, पास्ता किंवा न्यूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धूवून घ्या. मग बघा अगदी बाहेरसारखे नूडल्स घरी बनतील.
१७. पुऱ्या करताना चार चमचे कडकडीत मोहन घालावे व कणिक थोडी घट्ट मळावी. त्यात ४ वाट्या कणकेत १ वाटी बारीक रवा व चमचाभर साखर घालावी. पोऱ्या छान फुगतात व बसत नाहीत.
१८. डोस्याचे पीठ भिजवताना ३ वाट्या तांदूळ व १ वाटी उडीद डाळ घेऊन त्यात एक वाटी जाड पोहे व अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मिसळून सर्व एकत्र करून रात्रभर ठेवावे. डोसा कुरकुरीत होतो व तव्याला लागत नाही.
१९. काकडीची कोशिंबीर केल्यावर मीठ आयत्यावेळी घालावे म्हणजे कोशिंबिरीस पाणी सुटत नाही.
२०. उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे व रसदार राहतात.
२१. पनीर ला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात.
२२. जर जेवणांमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही. अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी कूटून किंवा किसून घालावा. असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो.
२३. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालं ही किसून घालावं.यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल. तसंच लिंबाच्या सालातील सत्त्व ही आपल्याला मिळेल.
२४. धान्य व डाळी साठवताना त्यात हिंगाचे खडे / लवंगा टाकाव्यात त्यामुळे धान्यास कीड लागत नाही.
२५. काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल.
(कांही टिप्स स्वानुभावरून व कांही इंटरनेट मायाजाल वरून)
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
Sir
Really very useful kitchen tip
Thanks
Great tips Sir, I wasn’t aware that besides being a great scientist u are a pro at kitchen too