‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली.
‘मेरा नाम जोकर चित्रपट’ हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांच्यासोबत सर्कशीत झोपाळ्यावर झुलणाऱ्या मुलीची भूमिका सेनिया रिबिनिका या रशियन अभिनेत्रीने केली होती. १९७० साली ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट दणकून सणकून आपटला. या चित्रपटाच्या निर्मितीत राज कपूरने अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. १९९० नंतर ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. ‘ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले त्याने १९९० सालानंतर नंतर, आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून दिले.
‘ज्या ‘मेरा नाम जोकर’चे दिग्दर्शन व निर्मिती राज कपूर यांची होती. मेरा नाम जोकरच्या आधी चित्रपटांच्या प्रसिद्धीची एकूणच पद्धत वेगळी होती. मात्र चित्रपट प्रसिद्धीला खरी सुरुवात ही राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’पासून झाली. त्या वेळी राज कपूर यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम वसंत साठे यांच्याकडे होते. वसंत साठे स्वत: राज कपूर यांच्या चित्रपटांची कथा लिहीत असत. १९७० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्यांदा रेल्वेच्या डब्यांवर ‘मेरा नाम जोकर’चे पोस्टर्स लावण्यात आले होते.
‘मेरा नाम जोकर’ मध्ये विदूषक बनलेल्या राज कपूर यांनी चालीं चॅप्लीनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांना हसता हसता रडविले. उत्तम आणि अर्थपूर्ण गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. शैलेंद्र, मुकेश, शंकर जय किशन आणि राजकपूर यांचे ‘जीना यहाँ हे गाणे अजून हो लोकप्रिय आहे. यात प्रमुख कलाकार होते राज कपूर, सिमी गरेवाल, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, ऋषी कपूर, दारा सिंग, पद्मिनी, सेनिया रिबिनिका. गीतकार होते हसरत जयपुरी, शैलेंद्र व संगीत होते शंकर जयकिशन यांचे.
‘मेरा नाम जोकर चित्रपट’
https://www.youtube.com/watch?v=pX_CfhLb9ak
‘मेरा नाम जोकर चित्रपटाची गाणी.’
https://www.youtube.com/watch?v=fZPARnL1AOQ
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply