आत्ता निकाल लागत आहेत, हे सर्व पाहून अनेक पालकांनी ७ वी मध्ये असतानाच प्लांनिंग करायला सुरु केले असणारच यात शंका नाही. कारण सतत अभ्यासक्रम बदलणार , नवीन मंत्री , नवीन नियम , नवीन अभ्यासक्रम . मुले -पालक गोधळणार हे साहजिकच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ते मोठ्या रकमा भरून ३ वर्षासाठी क्लासेस लावणार. तर काही ‘ गुरुकुल ‘ म्हणून शाळा निघत आहेत तिथे टाकणार. एकदा पैसे भरले की सर्व जबाबदारी त्या गुरुकुल असणाऱ्या शाळाची असणार , पालक मोकळे . परंतु कमी उत्पन्न असणाऱ्या पालक मात्र शोध घेणार काही क्लासेसचा . तर जाही आपले दागिने गहाण ठेवणार. मी हे सर्व उघड्या डोळ्याने पाहिले आहे अनुभवले आहे . डोळ्यात पाणी आणून पालक म्हणायचे सर तुम्ही आत्ता त्याचे सर्व बघा. पण मी त्यांना कधीच अंधारात ठेवले नव्हते , प्रयत्न करीन म्हणायचो. कारण खोटी आश्वासने कधीच दिली नाहीत.
माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक मुलगा ८ वी मध्ये आला होता. होता आडदांड. वडील सॉलिड तुडवायचे पण या भाईला काही व्हायचे नाही. मी त्या मुलाचे आकारमान बघूनच हबकलो होतो. त्याच्या वडलाना सागितले मी प्रयत्न करेन म्हणालो . मुलगा महिनाभर आला आणि गायब झाला. त्याची फी घेतली नव्हती . कारण मी आधी कधीच फी घेत नसे . माझा कडकपणा त्याला झेपला तर मग फी आण. अशा मुलांना दादा-पुता फार दिवस केलेले आवडत नसे. तिथे ‘ आखाडा ‘ करावा लागत असे. मुलांना मारू नये , गोड बोलावे असे आमच्या मुलांना आवडत नव्हते कारण दोन-दिवसात ते रंग दाखवावायला सुरवात करत ,मग मलाही माझा रंग दाखवणे सुरु करावे लागे. मध्यंतरी वर्तमानपत्रात एक बातमी आली की शिक्षकाने मुलाला बडवले म्हणून शिक्षकाला तुरुगात टाकले. एका जुन्या मुलाने मेसेज पाठवला, सर तुम्ही मग किती वेळा जेल मध्ये गेला असता. मी नेहमीच्या शिव्या घातल्या तो दणकून हासला . सर मुद्दाम म्हणालो तुमच्या शिव्या बऱ्याच आईकल्या नाहीत म्हणून म्हणालो कारण तुमच्या शिव्या आम्हाला आपलेपणा दाखवतात , कोणत्याही मुलाने कधी माझ्याशी वाकडे धरले नाही. काही आहेत कारण त्यांनी माझी फी बुडवली होती. तर हा आडदांड मुलगा जो गायब झाला तो दोन महीने मला वाटले क्लास सोडला , दोन महिन्यांनी त्याचे वडील त्याला बडवत आले . सर हा त्या चहाच्या टपरीवर सापडला , क्लासला येत नव्हता का ? मी म्हणालो दोन महिने गायब आहे आणि तुमचा पत्ता माहीत नव्हता . सर हा तुमच्याकडेच येणार हा पत्ता , पगार झाला की फी पाठवतो. सर सॉलिड तुडवा , मी काही बोलणार नाही , त्या कार्ट्याने वात आणला आहे. मी त्याला ९ वी पर्यंत पास करून दिला, पण १० वीचे प्रकरण त्याला झेपणारे नव्हते आणि मित्र बदलले होते , घुटकापण आला होता. मी त्याच्या वडलाना सागितले हे प्रकरण १० वी च्या पुढे जाणार नाही. अनेक वर्षे गेली तो जेव्हा भेटला तेव्हा मोठ्या बाईकवर होता , होता त्याच्या दुप्पट झाला होता . म्हणालो काय करतोस सर राजकरणात आहे होईन प्रगती बहुतेक, आपला केबलचा धंदा आहे. म्हटले १० वी झाला का नाही . नाही सर तुम्हाला तर माहीत आहे आपला अभ्यास. मग सगळे एकटाच सभाळतोस . नाही सर ५-६ माणसे आहेत. ती तरी शिकली आहेत काय ? हो सर एक तर डिप्लोमा होल्डर आहे. आपण शिकलो नाही पण काम करणारी माणसे शिकली आहेत. सर मी आधीच ठरवले होते सगळे धक्के खाल्यावर ,ते म्हणजे पगार घ्यायचा नाही तर द्यायचा . त्याचे हे उत्तर आईकून क्षणभर वाटले आयला ह्याने माझाच क्लास घेतला. तो शिको न शिको पण त्याचे हे तत्त्वज्ञान मला सॉलिड पटले.
आत्ता १० न झालेला मुलगा हे कुठून शिकला , मी तर त्याला हे सागितले नव्हते, त्याला त्याच्या अनुभवाने शिकवले . साहेब जाताना माझ्या पायाला हात लावून बाईकवरून गेले. असे वेगवेगळे नमुने भेटतच असतात. कोण कुठे ,तर कोण कुठे . काहीतरी करत रहातात . तशी अनेक प्रकारची मुले मला भेटली. एक तर असा भेटला के तो गुरूच वाटला , त्याला कमिशनचे महात्म्य सातवीतच समजले होते. त्या मुलाची फी राहिली होती. मी म्हणालो अरे गरीब माणूस आहे रे मी , ती माझी बोलण्याची पद्धत होती अरे फी आण जरा. तुझीच राहिली आहे . सर उद्या आणतो पण एक काम करावे लागेल. उद्या सागतो . मी ठीक म्हणालो . दुसर्या दिवशी उरलेली ५०० रुपये फी आणली , वर्गात ७-८ मुले होती. तासाभरात त्याला भूक लागली. मला समजले आज पोरे कापणार मला. मी १०० रुपये दिले. जा काहीही आणा. कारण मुले सकाळी लवकर यायची. नुसता चहा घेऊन यायची. त्यांना भूक लागायची. मुलेच ती. मी अनेकांना पुस्तके द्यायचो . कारण काहीच्या जवळ पैसे नसायचे. जितका कडक होतो तितकाच त्याच्या परिस्थीतिवर लक्ष असायचे .
सतीश चाफेकर.
Leave a Reply