आदरणीय, देवतूल्य, हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊया ! आज बाळासाहेब ठाकरे देह रूपाने आपल्या नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचा आवाज, त्यांचे लिखाण, त्यांची व्यंगचित्रे यांच्या रूपात ते आपल्यात आहेतच. आपल्या मनातील गाभार्यात त्यांना फार पूर्वीच देवत्व लाभल होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. त्यांच ते देवत्व प्रत्यक्षात साकार करण्यासाठी काहींनी बाळासाहेबांची आणि मॉसाहेबांची स्थापना प्रत्यक्ष देवळात करण्याचा घाट घातला आहे. बाळासाहेब स्वतः देव वगैरे मानत नव्ह्ते म्ह्णून काही प्रसारमाध्यमांतून त्यावर टिकेचा सूरही लावला. पण ते काही का असेना त्यामूळे बाळासाहेबांच देवत्व अधोरेखीत झाले हे निशिचत.
बाळासाहेबांनंतर शिवसेना मोडकळी येईल असे बर्याच जणांना वाटत होते पण प्रत्यक्षात तसे होताना काही दिसले नाही. आजही शिवसैनिक बाळासाहेब या जगात नसतानाही पूर्वी सारखेच शिवसेनेशी इमान राखून आहेत. बाळासाहेब एकमेव असे राजकारणी होते की त्यांच्या शत्रूंच्या मनातही त्यांच्याविषयी प्रेम होते. बाळासाहेबांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने त्यांचे स्मरण करणे हे अनिवार्यच आहे कारण भविष्यात आपल्या देशातील राजकारणाचा अभ्यास करणारयांसाठी बाळासाहेब हेच सर्वात जास्त कुतूह्लाचा आणि अभ्यासाचा विषय ठरतील यात शंका नाही. बाळासाहेबांना प्रत्यक्ष न भेटलेले, त्यांना प्रत्यक्ष न पाहिलेले कित्येक जण वेगवेगळया माध्यमातून त्यांचे विचार जाणूनच त्यांचे चाहते झालेले आणि त्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात.
बाळासाहेब फक्त एक प्रेमळ राजकारणीच नव्हते तर ते हाडाचे कलाकारही होते एक उत्तम व्यंगचित्रकार, पत्रकार आणि विचारवंत ही होते. त्यांच्याकडे भविष्याकडे डोळसपणे पाहण्याची अलौकीक क्षमता होती म्ह्णूनच अतिशय सर्वसामान्य माणसातील राजकारणी हेरून त्याला प्रोत्साहन देत त्यांनी त्याच्यातील राजकारणी घडविला. खरं सागांयच तर त्यांनी कित्येक मराठी तरूणांची आयुष्ये घडविली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य गृहीणींनाही राजकारणात आणण्याच महान कार्य खर्या अर्थाने बाळासाहेबांनीच केले आहे. आजही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या इतर राजकीय पक्षातील महिला कार्यकर्त्यांच्या तुलनेत प्रभावी भासतात कारण बाळासाहेबांनी त्याच्या मनात फक्त राजकारण न पेरता सर्वच बाबतीतला स्वाभिमानही पेरला आहे.
शिवसेना हा जरी राजकीय पक्ष असला तरी तो अनेकांच्या विचारसरणीवर उभा राहिलेला आणि वाढलेला पक्ष नाही. शिवसेना हा पक्ष पूर्वीही बाळासाहेबांच्या विचारावर उभा होता आणि आजही उभा आहे. त्यांच्या विचारांना बाजूला सारून हा पक्ष भविष्यातही कदाचित वाटचाल करू शकणार नाही. बाळासाहेबांचे विचार हेच या पक्षाचे खरे बलस्थान आहे. त्यामुळेच कदाचित आदरणीय उध्दव ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुख हे पद न स्विकारता शिवसेना अध्यक्ष हे नवीन पद निर्माण केले असावे. बाळासाहेब राजकारणी असतानाही हिंदूत्वाच्या मुद्दयावर नेहमीच ठाम राहिले आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी त्या बाबत तडजोड कधीच केली नाही. प्रसंगी त्यांनी आपली राजकीय मैत्रीही त्यासाठी पणाला लावली. बाळासाहेंबाना जनतेने बहाल केलेली हिंदूहृद्यसम्राट उपाधी त्यामूळेच सार्थकी ठरते. आजच्या पिढीत राजकारणात असणारया – नसणार्या सर्वच तरूणांच्या मनात व्यक्तीशः ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे असे एकमेव व्यक्तीमत्व म्ह्णजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने आंम्ही जर त्यांचे स्मरण करत त्यांच्यासमोर नतमस्तक झालो नसतो झालो तरच खरया अर्थाने करंटे ठरलो असतो नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply