आता सारेच नावापुरते
आस्था आपुलकी नाही
हास्य केवळ तोंड देखले
मनस्वी खरा आनंद नाही
” या, या, कसे आहात ?
बरेच दिवसात गाठ नाही
सारे काही ठीक आहे नां ?
शब्दात या कुठे प्रेम नाही
सारेच आता भावशून्य
ओढ अंतरी उरली नाही
भावनांचीच पायमल्ली
नाती तशी उरली नाही
दिवस येतो आणि जातो
आपले कुणी वाटत नाही
ऋतुऋतुही सारे बदलले
चैतन्य कुठेच उरले नाही
स्वार्थापोटी नित्य धावणे
याविण जीवन उरले नाही
श्वासात केवळ उद्विग्नता
हे शल्य मनीचे संपत नाही
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.२९९
२०/११/२०२२
Leave a Reply