नवीन लेखन...

कोपराचा सांधा

या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे.

हे ढोलक्याकृती मुसळ अलना या हाडाच्या अर्धवर्तुळाकार खाचेत फिरते व आपली महत्त्वाची कोपरांची हालचाल होते. अलनाच्या वरच्या अर्धवर्तुळाकार उखळीला ओलिक्रेनॉन असे नाव आहे. याच्याशी रेडियसचे वरचे टोक किंवा ‘हेड’ हे एका वर्तुळाकार अस्थिबंधाने बांधलेले असते. त्याला ऑर्विक्युलर लिगॅमेण्ट म्हणतात. हे रेडियसचे हेड दंडाच्या हाडाला जिथे भिडते त्या ‘गुमरस या हाडाच्या भागाला कॅपिटेल असे म्हणतात. हा भाग गोलाकार असून, इथे दुसरा छोटा कोपराचा सांधा तयार होतो. याशिवाय या दोन्ही सांध्यांना बांधण्यासाठी जाड आवरण असतेच व आत वंगण तयार करणाऱ्या ग्रंथीही असतात.

दंडाच्या कोपराकडील हाडाच्या टोकांना बाहेरील बाजूस व आतील बाजूस बाहुतील महत्त्वाचे स्नायू बांधलेले असतात. ही दोन्ही हाडांची टोके व ऑलिक्रेनॉन या हाडाचे टोक यात एक प्रकारचा त्रिकोण तयार होतो. ही तिन्ही टोके बाहेरून हात फिरविल्यास आपल्या हाताला लागतात. दंडातील हाड व बाहुतील हाड ही एका सरळ रेषेत नसतात तर त्यात बाहेरील बाजूस १५ अंशाचा कोन निर्माण होतो. याला कॅरिंग अॅन्गल म्हणतात.

स्त्रियांमध्ये हा कोन ५ ते ७ अंशाने अधिक असतो. कोपराची हालचाल केल्याने हात आपल्याला तोंडाजवळ व डोक्याजवळ नेता येतो. त्यासाठी कोपरात पूर्ण हालचाल असणे आवश्यक असते. काही कारणामुळे हा सांधा कडक झाला तर आपल्याला त्या हाताने जेवणे
कठीण होते. याशिवाय कोपराच्या बाजूने हातात जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या चेता व रक्त वाहिन्या हाडाच्या

जवळच असतात. कोपराजवळ हाडाला इजा झाली तर या महत्त्वाच्या चेता व धमन्यांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक ठरते.

-डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..