भूतकाळाला विसरून,
वर्तमानात सुधारण्याच्या
सतत प्रयत्नात असतो डोळस
रचत स्वप्नांचे मनोरथ !
डोळसांनी बघितलेली असतात स्वप्न
त्यांच्या मनातली
त्यांनी पाहिलेली
उघडया डोळ्यांनी !
डोळसांनी जीवनात
रंगीत, काळं-बेरं, चांगलं-वाईट
बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं
पण स्वप्नातील वास्तवात नको असतं !
जन्मताच अंध असलेल्यांची
ओळखच नसते रंगांशी,
आकार, उकारांशी,
चांगल्या वाईटाची !
त्यांना कधी स्वप्न
पडत असतील का?
कसे असतील त्यांच्या
स्वप्नातील रंग, आकार, ऊकार !
काय असतील मनोरथ?
देवा त्यांचे दु:ख त्यांना ठाऊक
याच जन्मी बघ रे त्यांना
डोळस होता आलं तर !
बघूदे त्यांना तुझे चरण,
अनुभवूदेत तुझे अकारण कारुण्य,
हे विश्व, हा निसर्ग,
पुढच्या जन्मी तरी
नको रे त्यांच्या पदरी अंधार !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply