नवीन लेखन...

आमचं नव्हे, त्यांचं !

नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं म्हणून त्याने रिसीव्हर आदळला. मी त्याचा कडवट झालेला चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. माणसं काही कारण नसताना अशी सतत वैफल्यग्रस्त असल्यासारखी का वागतात? त्यांना आनंदाची अॅलर्जी असते का? थोडंही नाउमेद न होता ‘मित्र’ नावाच्या आणखी एका प्राण्याला फोन लावला. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचं सौजन्य त्याने दाखवलं खरं, पण त्याचबरोबर ‘आम्ही एक जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला नववर्षाचा आनंद मनवणार आहोत’ हे सांगायला तो विसरला नाही. मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण ‘हे नववर्ष आमचं नव्हे’ हे ऐकून माझा उत्साह हळूहळू मावळू लागला.

आम्ही असे का वागतो? आयुष्याच्या क्षणभंगूरतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी एकत्र येऊन चार घटका आनंद मनविण्यासाठी मुद्दाम घडवून आणल्या जाण्याऱ्या विविध आनंदोत्सवांना धर्म आणि जातींमध्ये बुडवून काढण्याची आम्हाला का इच्छा होते? एका धर्माचे लोक आनंद मनवत असताना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यावेळी आनंद मनवू नये असं कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे? एखाद्या महोत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्यासाठी तो महोत्सव आधी ‘आपला’ असायला पाहिजे ह्यालाच सर्वधर्मसमभाव म्हणायचं का? आनंद वाटण्याऐवजी आम्ही आनंदोत्सवांना वेगवेगळ्या प्रकारची लेबलं लावून त्यांच्या वाटण्या करतो आणि त्यानंतर आनंदी राहायचं की दिवसभर आंबट चेहरा करून बसायचं हे ठरवतो. ज्यांना भूतकाळात खितपत पडायची सवय नसते त्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येकच दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस असतो !

केवळ ‘आमच्या’ नव्हे आणि ‘त्यांच्याही’ नव्हे तर ‘आम्हा सर्वांच्या’ नववर्षानिमित्त सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा !

— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..