नवीन लेखन...

प्रसिध्द अभिनेत्री दिप्ती नवल

दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच,परंतु त्या कुशल कवीयत्री,चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.या व्यतिरिक्त त्यांना संगीताची सुध्दा आवड आहे आणि त्या स्वत:काही वाद्य वाजवतात,हे विशेष.त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये’लम्हा-लम्हा’हे पुस्तक प्रसिध्द आहे.

५० वर्षांचे फिल्मी करिअर पूर्ण कराणा-या दीप्ती नवल यांनी’एक बार फिर’,’हम पांच’,’चश्मे बहाद्दूर’,’अंगूर’,’मिर्च मसाला’आणि’लीला’सारख्या काही सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे.तसे पाहता,दीप्ती नवल त्यांच्या’चश्मे बहाद्दूर’सिनेमामधून जास्त प्रसिध्द झाल्या होत्या.या सिनेमातील त्यांचा’चमको वाशिंग पाउडर’च्या’सेल्सगर्ल’चा अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे.

‘जलियावाला बाग’सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या’यारियां’सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे.जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये’बीए पास’आणि’औरंगजेब’सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या.या वर्षी रिलीज झालेल्या’महाभारत 3D’या अ‍ॅनिमेटेड सिनेमामधील’कुंती’पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..