पात्र परिचयः
१. अनंतराव भिडे – निवृत्त सरकारी अधिकारी.वय सुमारे ६५.वास्तव्य डोंबीवलीमधील एका जुन्या चाळीत.
२. वत्सलाबाई – अनंतरावांच्या पत्नी.वय सुमारे ६०.
३. दीपक ऊर्फ अण्णा – सर्वात जेष्ठ पुत्र.वास्तव्य नागपूर. नोकरी.
४. मंदार – धाकटा मुलगा.वास्तव्य पुणे. नोकरी.
५. प्रिया ऊर्फ बाबी – कन्या.शेंडेफळ. नवविवाहीत.
६. शेखर – प्रियाचा नवरा अनंतरावांचा जावइ.इंजिनीअर.वास्तव्य मस्कत.
७. ललीता- मोठी सुन.
८. स्वप्नील – दीपक चा मुलगा.
९ राधिका – दीपकची मुलगी.
१०. वैशाली – धाकटी सुन.पुणे.
११. सुखदा – मंदारची मुलगी.
१२ डॉ.वर्मा – मुंबइमधील एक डॉक्टर.
प्रवेश १ ला
वेळ रात्री ९ नंतरची.जेवण झाल्यानंतर अनंतराव त्यांच्या हॉलमधे शतपावली घालीत आहेत.एकीकडे तंबाखू मळीत आहेत.वत्सलाबाइंचं टीव्हीसमोर बसून जेवण चालू आहे.डाव्या हातात रिमोट.
अनंतराव – हया असल्या भुक्कड मालिका तुला आवडतात कशा तेच कळंत नाही.
वत्सलाबाई – अहो आपल्या जीवनात जे कधीही घडत नाही किंवा घडण्याची शक्यता नसते अशाच सिरिअल्स मला आवडतात.
अनंतराव – नवरा बायकोचा ३६चा आकडात्यांचा विरह नाहीतर काडीमोड आपापसात वितुष्ट अशा घटना दाखवण्यात निर्मात्यांना फार आनंद मिळतो.
वत्सलाबाई – गेल्या चाळीस वर्षात आपलं कधी भांडण झालंय ऋदोन दिवस तरी आपण एकमेकांपासून दूर राहिलोय परावास भरपूर केले पण तेही एकत्रच.माझी तिन्ही मुलं याच घरात जन्माला आली. मुंबईच्या बाहेर तुमची बदली झाली नाही.हे असं कधी बघायला मिळेल टीव्हीवर ?
अनंतराव- तू म्हणतेस ते खरं आहे.या चाकोरीबध्द जीवनाचा कंटाळा आलाय आता.काहीतरी थ्रील हवं आपल्या लाइफमधे.चार दिवस का होइना वृध्दाश्रमात जाऊन रहातो.तेव्हढाच चेंज मिळेल. एव्हढयात फोनवाजतो.अनंतराव फोन उचलतात तोच वत्सलाबाई ‘मंदारचा असणार’ असं म्हणून हात धुऊन येतात.टीव्ही बंद करतात.अनंतरावांच्या कानाला फोन.) आत्ताच तुझी
आठवण काढली बघ आइने. (त्यांच्या हातातून फोन घेतात आणि कानाला लावतात.)
आठवण काढली बघ आइने. (त्यांच्या हातातून फोन घेतात आणि कानाला लावतात.)
वत्सलाबाई- शंभर वर्ष आयुष्य आहे बघ तुला….हो……सकाळी आला होता बाबीचा फोन पण मधेच कट झाला.ठीक आहे ना रे ती?… पाचवा लागला ना तिला आता.इकडे आणायलाच हवं तिला आता.उशीर करून चालणार नाही…..मस्कतला?…..आम्ही
दोघेही?…..नको बाबा तिकडे*बरं देते हयांच्याकडे.( अनंतराव फोन घेतात )
दोघेही?…..नको बाबा तिकडे*बरं देते हयांच्याकडे.( अनंतराव फोन घेतात )
अनंतराव – हं बोल….शेखरची इच्छा आहे ? मुंबईला टेस्ट ? आम्ही ठणठणीत आहोत रे !…व्हिसासाठी ?बरं ये तू गाडी घेऊन. आम्ही तयार रहातो. सुनबाई आणि छकी कशा आहेत ?….हो आता प्ले ग्रुपमधे घालायला हरकत नाही.रमू दे शाळेत तिला….ठीक आहे.सकाळच्या चहालाच ये.वाट पहातो. (फोन ठेवतो.)
वत्सलाबाई- एव्हढं काय चाललं होतं बापलेकात?
अनंतराव- आपल्या जावइबापूंची इच्छा आहे आपण दोघांनी तिकडे जावं म्हणून.
वत्सलाबाई- ते कळलं हो मला मंदारकडून. पुढे सांगा.
अनंतराव- तिकडे जायचं म्हणजे व्हिजिटर्स व्हिश्यावर भागणार नाही.म्हणून शेखर आपल्यासाठी एक वर्षाचा
व्हिसा काढणार आहे.
व्हिसा काढणार आहे.
वत्सलाबाई – म्हणजे आपण एक वर्ष मस्कतमधे राहायचं ?
अनंतराव – तसं नाही गं.व्हिजिट व्हिसा तीन महिन्यासाठीच असतो.तीन महिन्यात आपण जाऊन येऊ शकू का?आपल्या बाबीचं बाळंतपण तिकडेच करायचं ठरलंय.शेखरने तिकडल्याच एका चांगल्या हॉस्पिटलमधे नाव घातलंय तिचं. तो सगळा खर्च त्याची कंपनीच करणार आहे. मंदार म्हणत होता ‘त्याने नुकतीच नवी गाडीही घेतली आहे.
वत्सलाबाई – प्रिया सांगतच होती गाडी घ्यायची आहे म्हणून.
अनंतराव – एक वर्षाच्या व्हिसासाठी आपल्याला मेडीकल टेस्ट द्यावी लागणार.त्या कंपनीचा डॉक्टर मुंबईत असतो. त्याच्याचकडे जायचंय आपल्याला.म्हणून तर मंदार गाडी घेऊन सकाळी लवकर येणार आहे. आपल्याला तयार रहायला हवं.चला झोपू आता.
वत्सलाबाई – तुम्ही पडा. मी एव्हढं ‘ मेजवानी’ बघून येते.
Leave a Reply