नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास त्याचे रुपांतर ‘ताडी’ म्हणजेच सौम्य प्रकारच्या दारूमध्ये होते. ताडी चवीला आंबट आणि उग्र चवीची असते.
नीरा पिण्याचे फायदे
ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक नीराचा आस्वाद घेतात.
सकाळ सकाळ काढलेल्या पाण्याचे म्हणजेच निराचे सेवन केल्याने रिफ्रेशिंग वाटते. निरादेखील आरोग्यदायी आहे. एका दिवसात १-२ ग्लास निरा पिणे फायदेसहीर ठरते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पण तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर नियमित नीरा पिणे अडथळा ठरू शकतो. निरामध्ये साखर आणि कॅलरीज अधिक असतात. निराऐवजी साखर,मीठ घातलेले लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते
पण हल्ली आरोग्य व उत्साहवर्धक नीरा या पेयाकडे लोकांचा कल कमी होताना दिसतो आहे.
कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही नीरा हे पेय लोकप्रिय झाले आहे. नागरिक उन्हाळ्यात पहाटे नीराचा हमखास आस्वाद घेत असतात.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नीरा विक्रीची परवानगी कोणाकडून मिळते? नीरा कोठून मिळते? नीरा विक्रीचा स्टाँल कणाकडून मिळतो? थोडक्यात म्हणजे निरा विक्रीचा व्यवसाय कसा चालू करावा याची पूर्ण माहिती हवी आहे.
याबाबल आम्हाला माहिती द्यावी
निरा विक्री संबंधित माहिती द्यावी.