गरिबी होती बालपणी मी किती मारल्या इच्छा
श्रीमंतीने रोग दिले अन् सर्व वारल्या इच्छा
माझी अजुनी जिवंत आहे ही लढण्याची वृत्ती
तिथे कुणाचा उपाय नसतो, जिथे हारल्या इच्छा
आधी बोलू नंतर प्रीती असे म्हणाली ती मज
दिला तिने हा नकार पण या न नाकारल्या इच्छा
तुझ्याप्रमाणे पत्रामधला मजकुर होता साधा
शब्दामधुनी मनात माझ्या किती सारल्या इच्छा
सागंत होती तिच्याच इच्छा, रात्री निघुनी गेल्या
सकाळ झाल्यावरती माझ्या मग विचारल्या इच्छा
दुःखाच्या बदल्यात घेतल्या देवाकडुनी गझला
या गझलांनी मला तारले आणि तारल्या इच्छा
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply