शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे झाला. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन मा.आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’ मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज’ च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून मा.आरती प्रभू बावरून गेले. प्रथम लोणावळ्याच्या वसतीगृहात ते नोकरीला होते. बहुतेक त्यावेळीच त्यांनी कर्जतला जागा घेतली. लोणावळ्याची नोकरी सुटली. मग काही वर्षे त्यांनी आकाशावाणीत नोकरी केली. ते काही वर्षे युनिव्र्हसिटीत होते, मात्र कुठल्याच नोकरीत त्यांनी स्वत:ला अडकवून घेतलं नव्हतं. नोकरी सोडताना आपल्या कुटुंबाचे अथवा स्वत:चे त्यांना भान नसायचे. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला असत. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात, असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना’, ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या माणूसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळवली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. “नक्षत्रांचे देणे” साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/
Leave a Reply