माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर
अन् वाढली आता माझी पॉवर…
लिफ्टने आता मी होणार लिफ्ट
गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट…
टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश
इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश…
चुरगळले कपडे आता होणार हद्दपार
सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार…
एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर
मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर…
मुंबई होणार आता झोपडी मुक्त
उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त…
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
Leave a Reply