साहित्य –
गव्हाचा रवा – १ वाटी
फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली, कांदा सर्व बारीक चिरुन – १ वाटी
उकळते पाणी – ३ वाट्या फोडणीचे साहित्य, मीठ, साखर – चवीप्रमाणे
साजुक तुप – २ चमचे तेल – आवश्यकतेनुसार
कृती –
१) गव्हाचा रवा मंद आचेवर गुलाबी भाजुन घयावा.
२) कढईत फोडणी करुन सर्व भाज्या टाकुन एक वाफ आणावी.
३) गव्हाचा रवा घालुनढवळावे व उकळते पाणी घालुन शिजु द्यावे.
४) मीठ, साखर आवडी प्रमाणे घालावे.
५) खायला देताना तुप घालुन खायला द्यावे.
२) कढईत फोडणी करुन सर्व भाज्या टाकुन एक वाफ आणावी.
३) गव्हाचा रवा घालुनढवळावे व उकळते पाणी घालुन शिजु द्यावे.
४) मीठ, साखर आवडी प्रमाणे घालावे.
५) खायला देताना तुप घालुन खायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply