।। विकटाय नम: करवीरपत्रं समर्पयामि।।
ह्याचे तीन मीटर उंचीचे क्षीरी गुल्म असते.पाने १०-१५ सेंमी लांब व २.५ सेंमी रूंद असतात व भालाकार असतात.फुले पांढरी/लाल उग्रगंधी व शेवटी मंजीरी स्वरूपात उगवते.फळ ८-१० सेंमी चपटे शेंग स्वरूपात असते व त्यात हल्क्या भुरकट रंगाच्या बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व मुलत्वचा.ह्याची चव कडू,तिखट,तुरट असून हे उष्ण गुणाचे असते व हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे शरीरातील कफ व वात दोष कमी करते.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
त्वचारोगात मुळाचा लेप उपयुक्त आहे.
मुळव्याधीत देखील मुळाचा लेप लावतात.
जखम झाली असून त्यातून स्त्राव येत असल्यास ह्याच्या पानांची चटणी व्रणावर बांधतात.
कडू चवीमुळे हे कृमींवर उपयोगी ठरते.
हृदयाला देखील हे बल देते व त्याची पोषणक्रिया सुधारते.
ह्याच्या पानांचे भस्म दम्यात चांगले काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
नमस्कार, मॅडम
मी असे ऐकले आहे की पिवळ्या कण्हेर चे मुळ तापा मध्ये खूप उपयोगी आहे, तरी आपण सविस्तर माहिती द्यावी.