कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!!
शिळपाक आंबल चिंबल, भिकार्यांना देतो
जुने कपडे घेणारे, फ़ार मुजोर झालेत
फ़ाटके तुटके कपडे विकत घेईनासे झालेत
मग असे कपडे मी भिकार्यांना देतो
आंगण त्यांच्या कडुन झाडुन झुडुन घेतो
कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!!
कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!!
आदिवासी पाड्यावर कारनी जातो
तांदूळ आणि मध मी येताना आणतो
मोलकरणीच्या मुलीला कामाला ठेवतो
मरेस्तोवर तिच्याकडुन काम करुन घेतो
कप फ़ुटला डिश फ़ुटली पगारातुन कापतो
थॅंक्यू व गुडमॉरनिंग म्हणायला शिकवतो
कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!!
कधी कधी मी सुद्धा देशभक्त होतो ॥
गांधी जयंतीला पांढरे कपडे घालतो
गांधींच्या फ़ोटोला हार घालतो
गांधीजी की जय, भारत की जय
अस ओरडुन घोषणा देतो
स्वातंत्राच्या लढ्यावर भाषण ठोकतो
नेत्याबरोबर माझा फ़ोटो छापून आणतो
कधी कधी मी सुद्धा देशभक्त होतो ॥
….अजिंक्य
— अजिंक्य
Leave a Reply