एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” …..
काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळील एका खेड्यातील प्राथमिक शाळेत जाण्याचा प्रसंग आला होता… आणि तेथील मुख्याध्यापकांना एका शिक्षिकेला तिने पहिल्या वर्गातील एका लहान मुलाशी इंग्रजी भाषेत संभाषण केले नाही म्हणून झापतांना पाहिले…
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील स्थानिक वाहिनीवर, ठाण्यातील शिक्षण समितीच्या अध्यक्षांना सर्व शाळातील शिक्षकांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी ते इंग्रजीत बोलत नाहीत यां कारणाने समज देतांना पाहिले….
भारतीय नावाचे एक “बेगडी” राष्ट्रीयत्व निर्माण केले गेल्यामुळे संपूर्ण समाज कसा सत्वहीन झालेला आहे त्याची ही उदाहरणे आहेत ….
— मिलिंद कोतवाल
Milind Kotwal
Leave a Reply