एकदा पहाटे लवकर जाग आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले.
सकाळी नेहमीप्रमाणे ढूध आणायला गेलो पैसे द्यायला लागलो तर धूधवाला म्हणाला कार्ड कुठे आहे अरे म्हटलं याला कस कळाल, त्याला मी कार्ड दिल त्याने ते swap केल. अरे म्हटलं काय गम्मत आहे क्रेडीट / डेबिट कार्ड देऊन भगवंतांनी आपल्याला gandwal वाटत. नंतर साबण आणायला गेल तर तिथे पण तेच कोणी पैसे घेइनाच फक्त कार्ड द्या अस सांगायला लागल. भाजी घेत्तांना सुद्धा तोच अनुभव थोडा घाबरलोच म्हणून चला म्हटलं शेजारी जाऊन येऊ. त्यांच्याकडे गेलो त्यांना झालेला प्रकार सांगितला ते म्हणाले पेपर वाचत नाही का ? आजपासून कागदी पैसा चालणार नाही कोणताही व्यवहार करा कार्डाचाच उपयोग करावा लागेल. म्हटलं काय दोखुताड आहे. कागदी पैसा बंद म्हणजे खर्च कसा करायचा.
नेमका आज घर घेण्याचा बेत रचला होता आणि black / White मध्ये black कॅश द्यायची होती. शेवटी बिल्डर कडे गेलो म्हटलं चांगली जागा आता हातची जाणार. पण जेव्हा मी बिल्डर कडे गेलो तेव्हा तो मला म्हणाला साहेब हि घ्या तुमच्या घराची चावी अहो म्हटलं तुमचा black मनी. तो म्हणाला कसला black मनी आता इथून पुढे प्रत्येक व्यवहार पतपेढीतून करावा लागेल त्यामुळे सगळा white नो black. इतका खुश झालो आणि पहिले पेढे घेतले ते पण कार्ड ने बरका.
शेजारचे काका आमच्याकडे आले म्हणाले अहो आज आमच्या पिंटूला इंगीनीरिंग कॉलेज मध्ये नाव घालून आलो आणि कुठल्याही प्रकारचे donetion न देता. मनात म्हटलं वां चांगला निर्णय घेतला सरकारने.
अरे पण आता एक समस्या आलीच आता हुंडा कसा घेयचा.
अहो वाचत काय बसलात जागे व्हा स्वप्न आहे ते.
— सचिन सदावर्ते
Leave a Reply