हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते तर फळ ०.३३-०.६६ मीली मिटर लांब शेंग असते हि वाकडी व चपटी असते हि २ च्या जोडीमध्ये येते.बी लहान व पांढरी असून दोन्ही बाजुला कापुस असलेली असते.फळ पिकल्यावर फुटते व बिया हवेत उडतात.
ह्याचे उपयुक्तांग त्वचा आहे.सातवीण चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाची हल्की व स्निग्ध असून कफवातनाशक आहे.
चला आता सातवीणीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखम धुवायला सातवीणीच्या सालीचा काढा उपयोगी आहे कारण तो स्त्राव कमी करतो.
२)सातवीणीच्या सालीचा काढा हा कृमिनाशक असून यकृताचे कार्य सुधारतो.
३)खोकला,दमा ह्यात सातवीणीचा काढा मध व पिंपळी चुर्ण घालून चाटायला देतात.
४)त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला सातवीणीचा काढा उपयुक्त आहे.
५)सातविणीचा काढा बाळंतीण स्त्रीला पावल्याने चांगली स्तन्य निर्मलीची होते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply