‘ती’ व ‘तो’ पहिल्यादा एकमेंकांना ‘चुंबन’ करत असतील त्यांच्यात गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. बोलताना अचानक ‘तो’ अतिशय गंभीर होऊन जातो आणि तिच्याकडे एक सारखा बघतो. तिला डोळ्यानी चुंबनाचा प्रस्ताव पाठवतो. तीही ‘स्मार्ट’. तो डोळ्यांचा इशारा तिला समजते आणि ते दोघे प्रदीर्घ चुंबनात तल्लीन होतात. परंतु, हे अनुभवी जोडप्याला शक्य आहे. पहिल्यांदा तर कमालीचा गोंधळ उडतो. त्यांच्या मनात प्रचंड भिती असते… ‘काही होणार नाही ना?’ हा तिचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न बहुतेक वेळा पहिल्या चुंबनाला प्रमुख अडसर बनतो. त्यामुळे पहिल्यादा आपल्या जोडीदाराला ‘किस’ करणे खरंच आव्हानात्मक आहे.
प्रेमी युगलाची भेट संपल्यानंतर ते परस्परांचा निरोप घेतात ही चुंबन घेण्याची खरी वेळ असते. ‘गुडबाय’ म्हणत प्रियकराला किंवा प्रेयसीला पहिला ‘किस’ करण्याची सुवर्णसंधी दुसरी असूच शकत नाही.
चुंबन घेण्याची सुरवात प्रेयसीकडून कधीच होत नाही, मात्र ‘ती’ तिच्या प्रियकराला डोळ्यांनी चुंबनाचा संकेत द्यायला विसरत नाही. त्यामुळे प्रेयसीच्या डोळ्यांतील छुपे संकेत प्रियकराने वेळीच ओळखले पाहिजेत. प्रेयसी तुम्हाला अगदी चिकटून बसत असेल, वारंवार तुमचा हात दाबत असेल किंवा तुमच्या केसाशी खेळत असेल तर तिला तुमच्याकडून प्रदीर्घ चुंबनाची अपेक्षा आहे, हे ओळखा.
पहिले चुंबन प्रदीर्घ असावे, त्याच्यासाठी आधीच कुठलीच मर्यादा आखून ठेवायला नको. जेव्हा तुमचे ओठ तुमच्या प्रेयसीच्या नाजूक ओठांचा स्पर्श करतील, त्याच्या काही क्षणानंतर हळूच ओठ वेगळे करावे. जोडीदार व तुमच्यात शेवटपर्यंत समन्वय असला पाहिजे.
Leave a Reply