नवीन लेखन...

भक्त ध्रुव (अढळ ध्रुवतारा)

वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।

असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।

प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।

ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।

खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।

प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।

कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।

लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।

उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।

ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।

उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।

सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।

ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।

हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।

ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।

नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।

माता सुनिती, हतबल होती,
न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।

आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।

न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।

भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।

नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।

उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।

प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।

ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।

प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।

ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।

नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।

बालक ते लहान, मनी विश्वास महान
विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।

असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।

मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।

मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।

मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।

मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।

तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।

इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।

अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।

इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।

संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।

प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।

निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।

दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।

‘वर’दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।

कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।

।। शुभं भवतू ।।

डॉ. भगवान नागापूरकर
१५- २७११८३

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..