२०१८ मध्ये प्रथमच घडणार्या काही गोष्टी बघूया :
भारतीय रेल्वेला मिळणार सर्वात शक्तीशाली इंजिन:-
मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड येथे देशातील सर्वात शक्तीशाली विजेवर आधारीत रेल्वे इंजिन तयार होत असून त्याचे लोकार्पण फेब्रुवारी २०१८ मध्ये होणार आहे
प्रथमच थिएटर ऑलिम्पीक :-
थिएटर ऑलिम्पीक चे आयोजन भारतात पहिल्यांदाच केले जात आहे. १७ फेब्रुवारी ते एप्रिल २०१८ या दरम्यान अनेक शहरामध्ये या ऑलिम्पीक चे आयोजन होत आहे .या अंतर्गत देश-विदेशातील ५०० पेक्षा जास्त सादरीकरण व ७०० पेक्षा जास्त अॅम्बिबयन्स परर्फोर्म असतील
देशातील पहिले रोजगार धोरण सरकार राबवणार :-
संयुक्त राष्ट्रांच्या कामगार अहवालानुसार,भारतात २०१८ मध्ये बेरोजगारांची संख्या १.८ कोटी होईल. २०१४ च्या निवडणुकीत मोदिनी दरवर्षी १ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते .२०१८ मध्ये सरकार पहिल्यांदा राष्ट्रीय रोजगार धोरण आणेल
पहिल्यांदाच खासगी ड्रोन उडतील:-
ड्रोन च्या व्यावसायिक वापरला परवानगी दिली जाईल. नागरी उड्डानमंत्रालयाने यासंबधीचा प्रस्ताव जारी केला आहे . २०१८ पर्यंत नियमांना अंतिम रूप दिले जाईल. २ किलोपेक्षा जास्त वजनी ड्रोन २०० फुटापर्यंत उडवण्यासाठी पोलीसांची परवानगी लागेल तसेच २ किलोपेक्षा जास्त वजनी ड्रोन उडवण्याचा परवानाही घ्यावा लागेल.
Leave a Reply