अमेरिका व चीन हे देश चलाख आहेत, ते स्वत: नुतन अर्थव्यवस्थेवर आपले लक्ष्य केंद्रित करत आहेत व त्याबरोबर सामग्री खर्च करत आहेत. पण बाहेर मात्र पाकिस्तानसारख्या देशाला शस्त्रपुरवठा करून भारताला उपखंडाच्या स्थानिक राजकारणात गुंतवून ठेवतात. भारतातील मनमोहनसिंग सारख्या विचारी नेत्याला हे समजले आहे, पण पाकिस्तानमध्ये ही समज नाही. भारताला काही करून या छोट्या भांडणातून बाहेर बाहेर येऊन जगातील मुख्य प्रवाहाबरोबर जाण्याची नितांत गरज आहे.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे सातत्याने राष्ट्रीय धोरणांवर लक्ष केंद्रीत करून असतात. आपल्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे बळकटी आणि नवीन बाजारपेठ मिळेल यावर ही राष्ट्रे सतत काही ना काही धोरणे राबवताना दिसतात. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि एकूणच राष्ट्रीय हिताला साजेशे निर्णय अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे घेत असतात. नुकतेच चीनने गूगलसारख्या आंतरराष्ट्रीय आणि नामांकीत कंपनीला आपल्या देशात राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून बस्तान बसवण्यास मज्जाव केला आहे. गूगल सारखी कंपनी माहिती आणि ज्ञानाचा एवढा अजस्त्र साठा पुरवण्याशिवाय चीनमधील तरुणांना भरगच्च पगाराच्या नोकऱ्यादेखील देत होती. असे असतानाही राष्ट्रीय हितासाठी चीनसारख्या राष्ट्राने हा निर्णय घेतला. अमेरिकाही या बाबतीत आपले धोरण राबवताना दिसते. काही दिवसांपुर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. सुरुवातीला आऊटसोर्सींगच्या मुद्यावर अडून राहणाऱ्या ओबामांच्या अजेंड्यावर भारतातील रिटेल इंडस्ट्री होती. अमेरिकेतील व्यावसायिक गुंतवणूकदारांना भारतात नव्या संधी अशा उपलब्ध होऊ शकतील यावर त्यांचा जास्त भर होता. आपल्या देशाचे हित कशे जपले जाईल यावर अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे अतिशय धोरणी आहेत. राष्ट्रीय हिताचा मुद्याला या देशांनी इतर मुद्यांपेक्षा नेहमीच पहिला प्राधान्यक्रम दिलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांमधील तणावाचा अमेरिका आणि चीनने व्यापारी दृष्टीकोनातून नेहमीच फायदा करून घेतला आहे. भारत-पाकिस्तानात मध्यस्थ राहून
सीमाप्रश्न टांगता ठेवायचा आणि सुरक्षेचे कारण दाखवून शस्त्रास्त्र विक्री करायची असा अप्रत्यक्ष डाव अमेरिका आणि चीनने नेहमीच खेळला आहे. निरिक्षण केल्यास केवळ भारत-पाकिस्तानात नाही तर संपूर्ण आशिया खंडात ही परिस्थिती अस
्याचे निदर्शनास येते. असे असले तरी भारताने हे सर्व लक्षात घेउन पुढे पाउले टाकली पाहिजेत. पाकिस्तानच्या बाबतीत ही बाब सध्या शक्य नसली तरी शेजारी म्हणून त्यांकडून आशा ठेवून याबाबत मदत करण्यास काही हरकत नाही. मनमोहनसिंगाना ही बाब कळली आहे. इतरही नेत्यांना ती कळायला हवी. या आणि राष्ट्रीय हिताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर संदिप वासलेकर यांनी आपल्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात गहिरे मंथन केले आहे.
— तुषार भामरे
Leave a Reply