तो राजा हरिश्चंद्रा प्रमाणे सत्ता गमावतो. विक्रमा आपली आत्मा मला देऊन टाक आणि खुशाल सिंहासनावर बैस. सिंहासनावर बसण्यास उत्सुक विक्रमाने लगेच आपली आत्मा तिच्या स्वाधीन केली. विक्रमादित्य सिंहासनावर बसला, त्याचा नावाचा जयघोष सुरु झाला. स्वर्गीय मधुर संगीताचा आनंद घेत विक्रमादित्याने डोळे मिटले. त्याला दिसू लागली – हिरवीगार शेती, प्रसन्न शेतकरी, स्वस्थ आणि खुशहाल प्रजा, सर्वत्र आनंदी-आनंद – संगीताचा तालावर ताल देत तो गुणगुणु लागला – आनंदी आनंद गड़े, इकडे तिकडे चोहुकडे …. अशा रितीने राज्यलक्ष्मीच्या कृपेने राजा वि
्रमादित्याने अनंत काळापर्यंत राज्य केले.
्रमादित्याने अनंत काळापर्यंत राज्य केले.
— विवेक पटाईत
Leave a Reply