जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही. रशियाची खरी ओळख करून देण्यासाठी आम्ही हा लेख आपणा समोर उपलब्ध करू इच्छितो.
रशिया क्लासिकल टूर व काही इतर रशियन हटके कनेक्शनस्:
साधारण रशिया टूरसाठी आपण ५ दिवस देतो. पण आम्ही ७ दिवसाचे पर्याय सुचवतो. रशियन संस्कृती, इतिहास, रीती-रिवाज, जेवण-खाण आणि इतर असे बरेच काही आहे, आणि अशासाठीच आम्ही पर्यटकांचा अभ्यास किंवा अगदी शिकवणीच घेतो ! एखादी छोटी अभ्यासपूर्ण रशिया ट्रिप पण तुम्हाला काही चांगल्या आठवणी देऊन जाते. युरोप ट्रिप प्रमाणे आपण फोटो स्टॉप घेतला व पुढे चालू लागलो असे रशिया ट्रिपसाठी लागू होत नाही बरं का ! उदाहणादाखल, एर्मिताज म्युझियम पहावयाचे असल्यास, ३-४ तास रशियन गाईड बरोबर भरपूर वेळ व चर्चा किंवा रशियन बॅले पाहताना आपणास थोडी माहिती देऊन पाठवले जाते. आता, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग सोडून रशिया पर्यटनाचे खूप चांगले पर्याय खुले आहेत, जसे, गोल्डन रिंग, लेक बईकल, इत्यादी.
रशिया क्लासिकल टूर व गोल्डन रिंग पर्याय:
गोल्डन रिंग मध्ये मॉस्को पासून अंदाजे ३०० किलोमीटर परिघात असलेली जूनी सांस्कृतिक वारसास्थळे आहेत. व्लादिमीर, सुजदल, येरेसलावल, रोस्तोव ए डॉन अशी काही वैशिष्ट्यपूर्ण गोल्डन रिंग शहरे आहेत. १००० सालापासून असलेली जुनी रशियन घरे, राजेशाही, तेथील संस्कृती, छोटे आठवडा बाजार, स्थानिक जेवण ह्याची जवळून पहायची संधी मिळते व खरा रशिया पाहिल्याचा आनंद गोल्डन रिंग पाहताना आपल्याला मिळतो.
किफायशीर ट्रान्स- सायबेरियन रेल्वे प्रवास:
रशिया टूर म्हटले तर लोकांना चटकन लक्षात येते ती ट्रान्स-सायबेरियन रेल्वे. जगातल्या सर्वात लांब रेल्वे प्रवासाबद्दल खूप काही वाचले गेले व खूप व्हिडिओ पाहिले गेले आहेत. ट्रान्स-सायबेरियन रेल्वे टूर ही ड्रीम टूर सारखी आहे. पण, हि आलिशान रेल्वे तशी खर्चिक व वेळ काढू आहे. खूप चर्चा करून सुद्धा बरेच पर्यटक ट्रान्स-सायबेरियन रेल्वे प्रवास नाही करत.पण कुतूहलापोटी आपण कमीतकमी चार किंवा पाच लाख रुपये खर्च करावा का हा प्रश्न बऱ्याच प्रवाशांना येत असावा आणि ही टूर करायचे आपण टाळतो. पण आम्ही हा प्रवास किफायतशिर, रंजक आणि सोपा व्हावा म्हणून काही रशियातील निवडक जागा घेऊन ट्रान्स-सायबेरियन रेल्वेची झलक अशी एक टूर प्लॅन केली आहे. ट्रान्स-सायबेरियन रेल्वे बरोबर लेक बायकलला चार दिस मुक्काम हा आमच्या रशिया टूरचा मुख्य उद्देश आहे. लेक बायकल हा जगातला सर्वात मोठा लेक आहे. हा लेक 650 किलोमीटर लांब आहे. चार दिवसांमध्ये आपण ह्या लेकच्या आसपास येथील निसर्ग संपन्न अशी जीवसंपदा अनुभवतो. इतर ट्रान्स-सायबेरियन टूरच्या किमतीपेक्षा आपण ही टूर 50 % कमी किमतीत
करतो !
नॉर्दन लाइट्स – रशिया:
अशाच अजून एका किफायतशीर रशिया टूरमध्ये अजून एक टूर म्हणजे नॉर्दन लाइट्स – रशिया ! हो रशियामध्ये सुद्धा आपण नॉर्दन लाइट्सचा अनुभव घेऊ शकतो. रशियामधील मूरमन्स्क हे शहर उत्तर ध्रुवापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर वसले आहे. आपल्याकडे असा समज आहे की नॉर्दन लाइट्स फक्त नॉर्वे, स्वीडन किंवा आयर्लंडला मध्ये जाऊन बघता येतात. पण हेच नॉर्दन लाइट्स आपण रशियातून 50% कमी किमतीत किफायतशीर रित्या पण बघू शकतो. मूरमन्स्क शहरांमधून नॉर्दन लाइट्स पहावयास मिळण्याची शक्यता ही 90 टक्के आहे. ह्याच मूरमन्स्क शहरांमधून आपण समर मध्ये रात्री बारा वाजता सुद्धा सूर्यदर्शन करू शकतो म्हणजेच मिडनाइट – सन पाहण्याचा अनुभव घेऊ शकतो. रशिया पर्यटनामध्ये असेच काही वेगवेगळे शहरांना भेटी देऊन हटके अनुभव करता येऊ शकतात. रशिया टूर सोबत आपण इतर सी. आय. एस (CIS) देश सुद्धा जोडून काही वेगळे करू शकता, जसे हटके बाल्टिक समुद्र जवळील इस्टोनिया, लात्विया, लिथुआनिया किंवा बेलारुसला भेट. अशा वैभवशाली, निसर्गरम्य व अदभुत रशियाला भेट देण्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढा व आम्ही (एक्सकूर्सीया टूर्स) तुमच्यासाठी काही वेगळे देण्यास तयार आहोत!
अधिक माहिती साठी संपर्क साधा – +919890004007