आजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते.काही जणांना गाडीची सर्विसिंग करतात तसं काहीतरी म्हणजे पंचकर्म असाव असे वाटते . पण प्रत्यक्षात असे काहीही नाही . शिवाय पंचकर्म हे रुग्णाला झालेल्या आजाराच्या तीव्रतेनुसार वमन , विरेचन , नस्य , बस्ती, रक्तमोक्षण या पाच कार्मापैकी कोणतेही एक कर्म प्रसानागानुरुप्प केले जाते.
गम्मत म्हणजे हे माहित नसल्याने रुग्ण वैद्याकडे जाऊन मला पंचकर्म करा असे स्वतः सांगतात . खरे तर पंचकर्म करावे किंवा नको हा निर्णय वैद्याचा असतो , शिवाय बर्याचशा व्याधींमध्ये पंचकार्माची आवश्यकता नसते.
१. शमन चिकित्सा : ज्यावेळी कोणताही आजार जास्त जुना झालेला नसतो त्याचे स्वरूपही सौम्य असते. त्यावेळी नुसती औषधे वापरून या आजारापासून रुग्णाची मुक्तता करता येते. याला आयुर्वेदात शमन चिकित्सा असे म्हणतात. आजकाल आधुनिक चिकित्सा पद्धतीत मुख्यतः शमन चिकित्सा वापरली जाते.
२. शोधन चिकित्सा : एखादा व्याधी फार जुना झालं असेल किनव त्याने उग्र स्वरूप धारण केले असेल किंवा शरीरातील दोष प्रमाणाबाहेर वाढून आजाराची चिकित्सा कारणे फक्त औषधाने शक्य नसेल तेव्हा शोधन चिकित्सा केली जाते. त्यावेळी पंचकर्माचा चांगला वापर होतो.
काहीवेळेस शरीरातील दोषांच्या बलाबलतेचा अभ्यास करून पंचाकार्माचा निर्णय घेता येतो .अशावेळेस आजार नवीन उत्पन्न झालं असेल किंवा त्यातील दोष कमी असतील तरी पंचकर्म करून शकतो.
— वैद्य राहूल काळे .
आयुःसिद्धी ,
कळवा (ठाणे )
संपर्क क्रमांक : 07506178981
Leave a Reply