जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे कारण नेहमीच असं होतं की जेंव्हा आपण ऑफिस बाहेर येतो तेंव्हा लगेचच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना सर्दी होणे, शिंकणे, खोकला या गोष्टी अनेक लोकांना होतच असतात. पण जर तेच थोडावेळ ऑफिसच्या बाहेर आल्यावर लगेच बरं वाटतं. हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही ऑफिस कोल्डने ग्रस्त असल्यामुळे होतं आहे. आपल्याला हे तर माहीतच आहे की सर्दी आणि खोकला या दोन्ही समस्या संसर्गजन्य आहेत. म्हणजे तुम्हाला सर्दी असेल तर तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनाही ती होण्याची शक्यता असते. या प्रकारचं इन्फेक्शन हे जास्तकरून वातानुकूलित ऑफिसमध्ये वेगाने पसरतं. अशात यापासून वाचण्यासाठी काही सोप्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?
शरीर कायम हायड्रेट ठेवा
आपल्या सर्वांना हे चांगलेच माहीत आहे की, पाणी हे केवळ तहानच भागवत नाही तर सतत होणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक समस्यांवर औषधासारखं काम करतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात तर आजाराने तुमच्या शरीरात होणारं डिहायड्रेशन योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने दूर होतं आणि आपल्या शरीरात पाण्याचा स्तर कायमच योग्य प्रमाणात राहण्यास त्याची खूपच मदत होते. म्हणूनच तुम्ही जरी वातानुकूलित ऑफिसमध्ये काम करत असाल तरी योग्य प्रमाणात पाणी पिणे हे अत्यंत गरजेचे आहे.
हात नेहमी स्वच्छ करा
डॉक्टर आपल्याला नेहमीच हे सांगत असतात की कोणत्याही संसर्गजन्य आजारापासून दूर रहायचं असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपले शरीर जर्म-फ्री असले पाहिजे. नियमीतपणे जर आपण कोणतेही खाद्य खाण्यापूवी २० सेकंद व्यवस्थितपणे साबणाने हात धुतल्यास हातांवरील बॅक्टेरिया दूर होण्यास त्याची खूपच मदत होते. असे केल्याने तुम्हाला फायदा तर होईलच सोबतच तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही कुठल्याही समस्या होणार नाहीत.
कामात छोटे ब्रेक घ्या
आपल्यापैकी बरेच जण आज साधारण ८ ते १० तास बसून काम करतात पण कामाच्या दरम्यान दर साधारण २ तासांनी आपल्या जागेवरून उठून ऑफिस पॅसेजमध्ये थोडं चालण्यासाठी ब्रेक घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही एकाच जागी बसून अनेक तास सतत काम करत असाल तर आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करून आपलं शरीर नकळतपणे थंडी आणि सर्दीच्या जाळ्यात अडकते. त्यामुळे आपण अशा स्वतःहून निर्माण केलेल्या स्ट्रेसपासून बचाव करण्यासाठी दर काही वेळाने कामातून ब्रेक घ्या.
चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी घ्या
तुम्हाला जर रोज सकाळी कॉफी किंवा चहाची सवय असेल तर रोज सकाळच्या कॉफी किंवा चहाच्या जागी ग्रीन टी घेणे सुरु करा. कारण ग्रीन टी मधील नैसर्गिक अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करून तुमचा संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते.
नियमित व्यायाम करा
एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे व्यायाम हा फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तर उपयोगी आहेच शिवाय जर तुम्हाला रोजच्या जीवनात वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर त्यालादेखील रोजच्या रोज केलेला व्यायाम खूप फायदेशीर ठरतो. व्यायाम केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहण्यास त्याची मदत होते. म्हणूनच रोज सकाळी लवकर उठून स्वतःला व्यायाम करण्याची सवय लावा.
Sanket
Leave a Reply