अनाहता, अनादि-अनंता,
वाहिले तुज मी चित्ता ,
व्हावी तुझी मजवरी कृपा,
हीच उरी आंस बाळगतां,–!!!
शरण तुज आले रे दयाघना, तनमन मस्तक नमवितां,
तुजकारणी देह पडावा,
आठवते तुज कृपाकरा,–!!!
तुज पायी वाहिल्या मी,
अनेक अरे वेदना,
काय सांगावे दुःख,
किती भोगाव्या यातना,–!!!
शरीर, मानस झिजवतां,
नच मिळे सुख पण वंचना
जावे कुठे सांगावे कोणा,
देव मानती केवळ पाषाणा,–!!!
अशात तुला पाझर फुटावा,
हीच विनंती, हीच कामना बुडबुडे सुखांचे सारे विरतां,
सांग कुणाच्या काय हाता,-?
खोल-खोल त्या गर्तेत पडता,
आहे का कोणी मज त्राता,–!! लपलेले असे दुःख छेडता, काळजाला जाती कशा चिरा,–!!!
कुठून आणावे मी आनंदा,
व्यथित मी, निराश जगता,
*अनाहता, अनादि अनंता,
वाहिले तुज मी चित्ता*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply