उत्फुल्ल झाली जास्वंद,
केवढी ही तिची मिजास,-? वाऱ्यावर उठते डंवरून, झाडाभोवती जशी आरास,–!!!
लालचुटुक रंग तिचा,
जिवाचा आपल्या ठांव घेई,
टपोरे फुलते फूल जसे,
फांदीवर झोके घेई,–!!!
सुंदर रंगसंगती केवळ,
निसर्गराजाचाच वास,
कुठलाही ना तिला गंध,
तरीही भासे जणू खास,–!!!
आखीव रेखीव पाकळ्या,
गडद रंगी उमललेल्या,
भुंगे अधीर पराग टिपण्या,
इतक्या पहा मुसमुसलेल्या,–!!!
बिंदू छोटे पिवळे भोवती,
कडेकडेने पाकळीच्या जसे,
उडत जसे छोटे कारंजे,
परागकण उडवत *रेषा,–!!!
सुंदर फूल ते टंच,
पाहताच डोळ्यात भरते,
ठाशीव कसा आकार कंच, मस्तमौला मजेत झुलते,–!!!
हळूच कधी दडे पानात,
लपून पाहे जगाची गंमत,
असे बहरे दृष्टिआड,–
जाणून त्याचा घ्यावा शोध,–!!!
ऐटदार दिसे पहा,
मुखडा राजस बाळा,
म्हणे थेट मला आता,
श्रींच्याच चरणी वहा,–!!!
© हिमगौरी कर्वे
मॅडम,आपल्या नांवासह ही कविता शेअर करु शकतो का?