सुखाच्या सरींनी मन हे बावरे
किती प्रेमळ माझा बाप रे
वळणा वळणावर साथ त्याचीच रे
भविष्यातिल संकंटांना
मिळो तुझीच ढाल रे
सुखाच्या सरींनी मन हे बावरे
आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे
सुसंस्कारीत मन माझे घडविले रे
समाजात वावरतांना तिने मला जपले रे
सुखाच्या सरींनी मन हे बावरे
सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे
झुलवतोस सुखी झुल्यावर दिनरात रे
मी नाहीच माझी,आता सर्वस्वी तुझीच रे
सुखाच्या सरींनी मन हे बावरे
वार्धक्याच्या कुशी तरीही,मी बिंन्धास्त रे
असो दुखणे-खुपणे,नाही चिंता मला रे
सुखलोलुप होता काया,मी संतृप्त झाले रे
— सौ. माणिक शुरजोशी
Leave a Reply