मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ….१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी
करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी….२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे….३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती….४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे….५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी
प्रवास केला आगळा, हेच येते समजूनी….६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते….७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply