मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना ।।२।।
तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी ।।३।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
सेवा शक्ति मला छळे, तुला कांहीं न कळे, ।।३।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।४।।
उभा केलेस मजला तू टाकलेल्या विटेवरी,
मग्न आई-बाप सेवेत, निघूनी गेला दूरी ।।५।।
होऊनी गेली, अठ्ठावीस युगे,
आज देखील, मी वाट बघे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply