मार्टिन जेम्स गुप्टिल याचा जन्म 30 सप्टेंबर 1986 रोजी न्यूझीलंड येथील ऑकलंड येथे झाला. महत्वाचे म्हणचे क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये तो सलामीला खेळाला हे विशेष. अर्थात त्याने शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये खेळला परंतु आजही तो एकदिवसीय क्रिकेट आणि टी 20 चे सामने खेळत आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात द्विशतक केले असून तो न्यूझीलंडचा असे शतक करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे असे करणारा तो पाचवा खेळाडू आहे. तो वर्ल्ड कपमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू आहे तर एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.
मार्टिन गुप्टिल हा शाळेपासून क्रिकेट खेळत असून तो शाळेच्या टीमकडून देखील खेळला आहे तसेच तो अभ्यासात देखील शेवटच्या वर्षी परफेक्ट होता. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या डाव्या पायाला दोन बोटे होती कारण वयाच्या १३ व्या वर्षी त्याला अपघात झाला त्यात त्याच्या त्या पायाची तीन बोटे गेली.
मार्टिन क्रो हा त्याचा आणि रॉस टेलर याचा मेंटॉर होता . कारण तो मार्टिन गुप्टिल याचा फॅमिली फ्रेंड होता. मार्टिन गुप्टिल हा न्यूझीलंडकडून तर खेळलाच परंतु तो आय.पी.एल . मधूनही खेळला .तसेच मुखत्वेवरून तो डर्बीशार , ऑकलंड , बार्बाडोस , ट्राडेंट्स कडूनही खेळला . तो फर्स्ट क्लास क्रिकेट , कसोटी क्रिकेट खेळला त्याचप्रमाणे एकदिवसीय आणि टी -२० फॉरमॅटमध्ये खेळला विशेष म्हणजे सर्वच फॉरमॅटमध्ये त्याने शतके केलेली आहेत. सर्वात जास्त शतके त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट आणि एकदिवसीय सामन्यात केलेली आहेत. तो अजूनही एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळत आहे फक्त त्याने शेवटचा कसोटी सामना २०१६ मध्ये भारतीय संघाविरुद्ध इंदोरला खेळला .
मार्टिन ह्याने त्याचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना 2006 मध्ये खेळला तर अद्यापही तो फर्स्ट क्लास क्रिकेटमधूनही खेळात आहे. त्याने आतापर्यंत 47 कसोटी सामन्यात 2,586 धावा केल्या त्यामध्ये त्याने 3 शतके आणि 17 अर्धशतके केली. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 189 धावा त्याने 8 विकेट्स घेतल्या असून 50 झेलही पकडले आहेत. त्याने 183 एकदिवसीय सामन्यात 42.50 च्या सरासरीने 6,843 धावा केल्या असून आतापर्यंत त्याने 16 शतके आणि 37 अर्धशतके काढली आहेत. त्याची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे नाबाद 237 धावा. त्याचप्रमाणे त्याने 109 धावा देऊन 4 विकेट्सही घेतल्या असून 76 झेलही पकडले आहेत. त्याने 88 टी – 20 सामन्यात 2,536 धावा काढल्या असून 2 शतके आणि 15 अर्धशतके काढली आहेत. त्याची टी – 20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे 105 धावा. त्याने 110 फर्स्ट क्लास सामान्यत 7056 धावा काढल्या असून त्याच्या सर्वोच्च धावा आहेत 227 . तसेच त्याने 15 शतके आणि 37 अर्धशतके काढली आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या असून एकूण 118 झेलही पकडले आहेत.
मार्टिन गुप्टिल याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 189 धावा काढल्या तर 21 मार्चला क्वार्टर फायनलमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 163 चेंडूत 237 धावा काढल्या . तो नॉक आऊट स्टेजला द्विशतक काढणारा पहिला खेळाडू आहे. त्यावेळी त्याने 11 षटकार आणि 24 चौकार मारले. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने एकूण 547 धावा काढल्या .
मार्टिन गुप्टिल याने 28 डिसेंबर 2015 रोजी 17 चेंडूंमध्ये 50 धावा काढल्या त्यावेळी अशा धावा काढणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू होता. तर 2015 मध्ये तो सर्वात जास्त एकदवसीय सामन्यात धावा काढणारा खेळाडू होता त्याने एकूण त्या वर्षी 1,489 धावा काढल्या त्या 32 सामन्यात त्यामध्ये त्याने 4 शतके आणि 8 अर्धशतके काढली. 2017 साली तो सर्वात जास्त धावा काढणारा 10 वा खेळाडू होता. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत आणि महत्वाचे म्हणजे तो अजून खेळत आहे.
मला त्याला मुंबईत भेटण्याचा योग आला तेव्हा त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या.
त्याचे हे रेकॉर्ड्स १३ मार्च २०२० पर्यंतचे आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply