दीक्षित आणि दिवेकर, किंवा इतर कुठला डाएट करत असाल तर त्याला सुट्टी, कारण आज आहे, आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस.
पहीला नो डाएट दिवस इग्लंड मध्ये मैरी इवांस यांनी ६ मे १९९२ रोजी साजरा केला. १९९८ सालापासून ६ मे रोजी पूर्ण जगात हा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस पाळला जातो.
डाएट म्हणजे काय तर सोप्या भाषेत वाढलेले वजन घटवण्यासाठी ची विशिष्ट आहारप्रणाली. अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा मोठा गंभीर प्रश्न असतो. त्याप्रमाणे वजन कमी करणे हा मुद्दा असल्याने लोक डाएट साठी प्रेरीत होतात. डाएट करण्यामागे एकच उद्देश असतो, ते म्हणजे कमी कॅलरीजचं सेवन करणे. दीक्षित डाएट, दिवेकर डाएट, पालेओ डाएट, किटो डाएट, डॅश डाएट, व्हिगन डाएट, एल्कलाइन डाएट, फॅड डाएट, Gm डाएट, लूनर डाएट, बेबी फूड डाएट,ज्युस डाएट,रॉ फूड डाएट, गडद निळ्या रंगाच्या ताटात जेवण करणे,आरश्यासमोर बसून जेवणे असे अनेक देशी व आंतरराष्ट्रीय व विचित्र डाएटचे प्रकार आपण सध्या बघत आहोत. आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक आप-आपल्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट फॉलो करत आहेत. त्यामुळे नवीन नवीन डाएट ट्रेंड येत आहेत. हे ट्रेंड सर्व जगात आज कोण ना कोण पाळत आहेत.
आज या सर्व डाएटला सुट्टी द्या. डाएट पाळणाऱ्यांनो आज आपल्या जिभेचे लाड होऊ द्या आणि वेगवेगळ्या उत्तम चवींनी तृप्त व्हा. आजच्या दिवशी असे म्हणा आज मी माझ्या आवडीचे पदार्थ खाणार……….
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply