“तु का तो चोर!”
शिक्षा-प्रायश्चित
त्यांचा झाडावरील पिकलेला पेरू कुणीतरी खाल्या म्हणून शेजारच्या काकू बडबडत होत्या.
गोपाळ कुणी खाल्ला असेल रे तो पेरू!
आई मीच खाल्ला. तुच निरोप द्यायला सांगितले बघ मला सकाळी कि तुमचा कार्यक्रम उद्या दुपारी नवले काकूकडे ठरला आहे हे सांगायला गेलो होतो.
काकूला निरोप देऊन परतत असताना पेरूच्या वासाने मला आकर्षित केल. माझ लक्ष त्या पिकलेल्या पेरूने वेधून घेतल. फार उंच नव्हता तो. माझा नकळत माझा हात पेरूकडे गेला. हात लागताच तो छोटासा पिकलेला पेरू माझा हातात आला. छोटासाच होता तो. हाताने पुसला व मी खाल्ला.
अस दुसऱ्याच्या त्याब्यातील वस्तू आपण त्यांच्या नकळत घ्यायची असते का?
नाही आई, चुक झाली माझी.
मग आता शिक्षा घ्यावी लागेल.
हो आई. काय शिक्षा देणार.
दहा सुर्यनमस्कार आता काढ व म्हण ‘ परत मी अशी चूक करणार नाही.’ मग हा मुगाचा लाडू खा.
बर आई.
गोपाळ दहा सुर्यनमस्कार काढतो. परत अशी चूक करणार नाही अस सुर्याला स्मरून म्हणतो.
आई मी जरा काकू कडे जाऊन येऊ.
लाडू खायचा नाही का!
आल्यावर खाईन आई.
का रे!
प्रायश्चित घेतो.
आई गोपाळला प्रेमाने गोजारते व जा म्हणते.
गोपाळ शेजारच्या काकूकडे जातो व म्हणतो “काकू माझी चूक झाली. मी तो तुमचा झाडावरील पेरू खाल्ला.
” तुच का तो चोर! बाळा अस करू नये, मागून खाव. जा, पळ. परत अशी चूक करू नकोस.
गोपाळ त्यावेळी आंनदाने पळत घरी आला खरा पण ‘तु का तो चोर’ हे काकू चे चार शब्द गोपाळच्या कायम स्मरणात राहिले.
श्रीकांत बर्वे ०२/११/२०२०
Leave a Reply